महाराष्ट्र वेदभुमी

पोस्को कंपनीने सी.एस.आर.उपक्रमांतर्गत केले प्रेरणा भेटीचे आयोजन.

माणगाव :- (नरेश पाटील) 

पोस्को कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्व (CSR) उपक्रमांतर्गत विळे, भागड, निजामपूर परिसरातील विविध गटांकरिता प्रेरणा भेटीचे आयोजन करीत आहे... माहिती सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष बघून अनेक गोष्टी सहजपणे लक्षात येतात व पटतात ही गोष्ट लक्षात घेऊन कंपनीने दि. १२ ऑगस्ट रोजी प्रेरणा भेटीचे आयोजन केले होते... यावेळी जवळपासच्या गावातील सी.आर.पी., महिला बचत गटांच्या प्रतिनिधी आणि काही प्रमुख पदावर कार्यरत असणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या... या भेटीचा मुख्य उद्देश स्थानिक गरजा ओळखून त्यातून उत्पन्नाचे साधन कसे निर्माण करता येऊ शकते व याचे मार्गदर्शन प्रत्यक्ष अशा चालू असलेल्या संस्था दाखवून करून देणे आहे... पेण या ठिकाणी महिलांनी स्थापन केलेल्या आणि महिला नेतृत्व असलेल्या ‘अहिल्या महिला मंडळ’ आणि ‘आई डे केअर’ या दोन संस्थांना भेट दिली...

“अहिल्या महिला मंडळ” च्या अध्यक्षा श्रीम. अश्विनी गाडगीळ मार्गदर्शन करताना म्हणाल्या, “स्त्रीने जर ठरवलं तर ती कोणतीही गोष्ट सहज करू शकते, तिच्यात तेवढी क्षमता असते...फक्त प्रत्येकीला ती क्षमता ओळखण्याची आणि आर्थिक, मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या सक्षम बनण्यासाठी तिचा योग्य वापर कसा करायचा हे समजून घेणे आवश्यक आहे.” तसेच त्यांनी शासनाच्या विविध योजना, आर्थिक साक्षरता, बचत गटांसाठी उपलब्ध संधी अशा अनेक विषयांवर मार्गदर्शन केले...

श्रीम. स्वाती मोहिते यांनी स्थापन केलेल्या “आई डे केअर” ला दिलेली भेट हि तितकीच प्रेरणादायी होती...पेण शहर आणि आसपास गतिमंद, मतीमंद मुले आहेत, ज्यांना स्वावलंबी होण्यासाठी विशेष शिक्षणाची आवश्यकता आहे हि सामाजिक गरज लक्षात घेऊन ही संस्था चालू केली व मुलांना विशेष प्रशिक्षण देऊन समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याचे काम करतात... महिलांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, “ समाजामध्ये अशा असंख्य समस्या/आव्हाने आहेत ज्यात आपण लोकांची मदत करू शकतो निदान तसा प्रयत्न तरी करू शकतो...समाजातील समस्या ओळखून त्याचे रुपांतर अश्या प्रकारची संस्था, उद्योग निर्माण करू शकतो पण आपण याकडे संधी म्हणून पहिले पाहिजे.” शून्यातून सुरु झालेली हि संस्था संस्था आज कित्येत मुलांसाठी आशेचा किरण आहे...

Post a Comment

Previous Post Next Post