माणगाव :- (नरेश पाटील) खांदाड येतील मोर्बा रोड वरील एकता नगर मित्र मंडळ तर्फे नव्या एस्टी थांब चे नामफलक ७८ वा स्वातंत्र्य दिनाचे पूर्वा संध्येला बुधुवारी दि.१४ ऑगस्ट सायंकाळी रोजी उपस्थित मान्यवर यांच्या हस्ते फीत कापून शानदार अनु उत्साहाचा वातावरणात लोकार्पण सोहळा संपन्न झाला...
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्ष ज्ञानदेव पोवार, सभापती प्रशांत साबळे, माणगाव एस्टी डेपो चे अगर प्रमुख सौ. छाया कोळी, खांदाड गावचे अध्यक्ष तथा तत्कालीन ग्रामपंचायत चे माजी सदस्य काशिराम पोवार, ज्येष्ट पत्रकार अरुण पोवार आणि एकता नगर मित्र मंडळ चे अध्यक्ष निरने सर व्यासीठावर उपस्थित होते...दरम्यानचा काळात कार्यक्रम ची सुरूवात आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अर्धा पुतळ्याला ज्ञानदेव पोवार तसेच प्रशांत साबळे यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले...
या नंतर निरने सर यानी स्वागत तसेच प्रास्ताविक केले... तदनंतर व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवर व्यक्ती यांना एकता मित्र मंडळ ची पदादिकरी सह ईतर सदस्य यानी पुष्प गुच्छ देवून सन्मानित केले... यानंतर मान्यवर यांचे भाषण पार पडले आणि अंती एस्टी थांबचे नामफलक मान्यवर यांच्या प्रमुख उपस्थितीत व शुभ हस्तेनी तसेच श्रीफळ वाढवून शानदार लोकार्पण करण्यात आले...
दरम्यानचा काळात या अभिनव उपक्रम कार्यक्रम प्रसंगी खांदाड गावाचे उपाध्यक्ष ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अनंत पोवार, एस्टी अगर येथील काऱ्यलिन अधिकारी राजेंद्र नागेश,कृष्णा चौरे, शिवाजी देशमुख, नामंकीत मेकॅनिक अजित पवार खांदाड ग्रामस्थ माने काका, जयवंत पोवार, दत्ता शिंदे, मारुती मालोरे, शंकर पोवार, सचिन मांजरे, महेश पोवार, राहुल दासवते, सुनिल दत्त चव्हाण दिनेश पोवार, कृष्णा दिवेकर सह एकता मित्र मंडळ चे अनेक सदस्यही या वेळी आवर्जून उपस्थित होते... कार्यक्रमांचे आभार प्रदर्शन देगाव गावचे सरपंच तथा एकता मित्र मंडळ चे सदस्या सौ. सुषमा नितीन वाघमारे यांनी केले... सुत्र संचालन तत्कालीन ग्रामपंचायत सरपंच सौ. धुमाळ यांनी केले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एकता मित्र मंडळ चे सर्व सदस्य यानी विशेष मेहनत घेतल्याचे दिसून आले...
