महाराष्ट्र वेदभुमी

७८ व्या भारत स्वतंत्र दिनानिमित्त तळवली तर्फे अष्ठमी येथे रक्तदान शिबीर


अनंता म्हसकर धाटाव रोहा : गुरुवार दि.१५ .०८/.२०२४  रोजी ७८ व्या भारत स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज, सी.एस.आर विभाग प्रमुख सौ.माधुरी सणस यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श गाव विकास प्रकल्प अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत तळवली तर्फे अष्टमी या ठिकाणी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले...सदर रक्तदान शिबीरास ५३ लोकांनी रक्तदान करुन जनसेवा जोपासली आहे...

कार्यक्रम दरम्यान माणसाने आयुष्यामध्ये जनसेवेसाठी काही द्यायच असेल तर मानव रक्तच देऊ शकतो.. आणि १५/८/२०१४ तळवली रहिवाशांकडून हे आद्यकर्तव्य पार पाडले आहे...असे मत सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज चे साईट हेड श्री.विवेक गर्ग यानी व्यक्त केले...सहभागी रक्तदाते यांचे व सुदर्शन सी.एस.आर फाऊंडेशन अंतर्गत केलेल्या सामाजिक कामाचे सरपंच श्री.रवींद्र मरवडे यांनी वर्णन केले...

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन क्षेत्र अधिकारी श्री.अमर चांदणे केले व आभार प्रदर्शन श्री.रवि दिघे यांनी केले...

कार्यक्रम दरम्यान सुदर्शन केमिकल इंडस्ट्रीज चे  सिक्युरिटी हेड  श्री.गणेश बांभुरकर, उपसरपंच , ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक अधिकारी तसेच प्रतिष्ठीत लोकं उपस्थित होते...

या रक्तदान शिबीरास श्री.महेश डेरिया,श्री.संजय कचरे ,दिशांत ढाणे व विनय देशमुख आणि डाॅ.गोसावी व टिम यांचे सहकार्य लाभले...

Post a Comment

Previous Post Next Post