माणगाव :- (नरेश पाटील) गेली २० दिवस अर्ध्यातच मोसमी पाऊसाने विश्रांती घेतली होती... मात्र गुरुवार दिनांक.२३ रोजी सायंकाळपासुन रिमझिम पाऊसाला सुरूवात होवून ०६:४५ ला रौद्र रूप धारण करून धो धो पाऊस बरसू लागला... त्याचबरोबर आकाशाचा पूर्व दिशेकडून आभाळ भरुन सोबतच जोरदार वादळी वारा, विजेच्या कडकडन्याने कानंठळ्या बसतील येवढा मोठं मोठ्याने विजेंचा आवाज येवू लागला..तत्पूर्वी दिवसभर वातावरणामध्ये तापमानात कमालीची वाढ झाल्याने अक्षरशा घामाच्या धारा शरीरातून वाहत होत्या.., तर घरात प्रचंड उकाडा जाणवत होता... गेली चार पाच दिवसापासुन वातावरणात सकाळी ते दुपारपर्यंत तीव्र उष्णता, उन - सावली, अधून मधून वारा, शिवाय पावसाच्या सावटिने अंधार तर सायंकाळी ते रात्री रिमझिम तर कधी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत असल्याच्या परिस्थितीमुळे लोकांना मागील दोन- तीन दिवापासून वेगवेगळे वातावरण अनुभवायला मिळत आहे...
दुसरीकडे आता IMD कडून इंडीयन मेट्रो लॉजिकल विभाग. प्रादेशिक हवामान खात्याने दिनांक २५ पासुन पुढील महिनाच्या सप्टेंबर १२ पर्यंत जोरदार पाऊस वेळप्रसंगी काही दिवस अतीवृष्टी, होण्याचे नाकरू शकत नसल्याची माहिती तसेच धूवादार पाऊस बरसणार असल्याचे बुलेटिनमध्ये जाहिर केले आहे. याचा अर्थ मांन्सूनची दूसरी इनिंग सुरूवात झाली आहे... व त्याचा प्रत्यय गुरुवारी सायंकाळी ०६:३० च्या नंतर अर्धा तासाहून अधिक तुफान पाऊस पडल्याने सगळीकडे पाणीच पाणी झाले परिणामी वातावरणात प्रचंड कमालीची घट होवून गारवा निर्माण झाला... लोकांची गरमीतून सुटका होण्याची नैसर्गिक प्रक्रिया दिसून आली..
यावेळी छत्री अभावी लोकांमद्ये गोंधळ उडाल्याचे चित्र दिसून आले... दरम्यान झालेला जोरदार पाऊस व विजांमुळे सायं ०७च्या दरम्यान लाईट बऱ्याच उशिरापर्यंत नव्हती....काही काळानंतर लाईट आली परंतु अधून मधून रात्रीत अभाव जाणवत होता.... त्याचा परिणाम पिण्याचे पाणी सप्लाय करण्याऱ्या यंत्रणांवर झाल्याचा दिसून आले.. त्यामुळे महिलांची तारांबळ उडाली परिणामी अनेक महिलानी पाण्यासाठी नदी काठची वाट धरली..
