महाराष्ट्र वेदभुमी

आवरे स्वयंभू शिव मंदिरात श्रावणी सोमवार प्रातःआरती आणि व्याख्यान


आवरे-उरण ६ ऑगस्ट अजय शिवकर / शंकर पाटील : श्रावण मास हा भगवान शिवाची आराधना करून आशीर्वाद घेण्याचा महिना,  शिवाला  सर्वात प्रिय   श्रावण महिना असतो एक अर्थी श्रावण म्हणजे श्रवण किंवा ऐकणे होय, भगवान शिव यातून एकच संदेश देत आहेत की चांगले ते ऐकावे व कृतीतुन दर्शवावे..


श्रावण  महिन्यात शिवतत्व हे सहस्त्र पटीने संचार करत असते श्रावण महिन्यात केलेलं व्रतवैकल्य हे अगदी आपल्या ध्येयाजवळ नेत असते,  प्रती-वर्षी  आवरे येथील स्वयंभू शिवमंदिरात  अनेक सण उत्सव साजरे  होत असतात, त्यापैकीच श्रावणी सोमवार एक होय...आरती समूहाच्या तर्फे  श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारी प्रात्य:काकड आरतीचे  आयोजन करण्यात आले...


आरतीचा आजचा मान पंचक्रोशीतीत आपल्या गावाचं नावलौकिक  सातासमुद्रापार नेणारी  भोळेनाथ क्रिकेट टीम ला मिळालं...क्रिकेट टीमच वैशिष्ट्य म्हणजे टीम च नाव हे ह्या भोळेनाथच्या  नावावरून आहे..

विशेष आकर्षण म्हणजे मंदिरात श्रावणी सोमवारचे महत्व सांगण्यासाठी सनातन संस्थेच्या वतीने  श्री. योगेश ठाकूर सर यांनी सणाचेमहत्व विशद केले, तसेच आजची परिस्थिती आणि हिंदू यांनी कसे जागे व्हावे यावर विशेष व्याख्यान दिले...


सदर व्याख्यान ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शिवभक्त मंदिरात जमले होते आरतीची सुरवात  शिवस्तुती व भगवान भोळेनाथाची आरती सर्व शिवभक्तांनी  टाळ-मृदंगाच्या  समवेत घेतल्याने यांचा निनाद हा मंदिर व सभोवताली परिसरात घुमू लागला.  सदर  काकड आरती साठी भोळेनाथ टीम चे सर्व सदस्य , व शिवभक्त आवरे गावातील ग्रामस्थ हे मोठ्या संख्येने उपस्थित होते...

 श्रावणी सोमवार समूहातर्फे   आरतीचा उपक्रम हा सातत्याने मंदिरात होत असतो...

Post a Comment

Previous Post Next Post