सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक :- रामटेक मधील चौघान ते डोंगरी, महाराजपूर, मुकणापूर व पवनी, देवलापार वस्तीतील विद्यार्थी व नागरीकांना जाण्यासाठी सुर नदीच्या पुलावरुन वाहत्या पाण्यातुन वाट काढावी लागते... यांच्याकडे स्थानीक आमदार अँड. आशिष जयस्वाल व प्रशासनाचं दुर्लश करीत आहे...
आमदार आशिष जयस्वाल यांच्या दुर्लक्षपणा स्वतःच्या व्यवसायाच्या स्वार्थासाठी खिंडसी डॅम भरून ठेवला त्यामुळे चौघान ते डोंगरी सुर नदीवरील पुलावरून पाणी वाहत आहे... अशा परिस्थितीत शाळेतील मुलांना शेतकऱ्यांना नोकरी करणाऱ्यांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे.. प्रसंगी अपघात सुद्धा होण्याची संभावना आहे...
जीव धोक्यात घालून करावा लागतो प्रवास
वाहत्या पाण्यातून वाट काढत रस्ता पार करणाऱ्या विद्यार्थी व नागरिकांच्या समस्या काही नवीन नाहीयेत... तुम्ही पाहिलं असेल की, राज्यात अनेक ठिकाणी केवळ पावसाळ्यात नदीला पाणी आलं म्हणून अनेक गावांचा रस्ता बंद होतो... इथे मात्र चौघान ते डोंगरी गावच्या वस्तीच दुर्दैवं अस आहे की, कायम आपला जीव धोक्यात घालून या वाहत्या पाण्यातूनच वाट काढावी लागते...
प्रदीर्घ काळापासून आमदार पदाचा कालावधी असताना सुद्धा नवीन पुलाचे काम सुद्धा केले नाही... या पुलावरून डोंगरी, महाराजपूर मुकणापूर, तसेच दररोज पवनी, देवलापार कडे जाणारे रोजचे कर्मचारी शेतकरी वर्ग मजूर वर्ग व विद्यार्थी वर्ग मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे संतप्त झालेले सर्व नागरिक आमदाराच्या स्वार्थ हेतू कामकाजावर नाराज आहेत...
नदीवर पूल बांधण्याचं फक्त आश्वासन
सुर नदीच्या काठावर असलेलं चौघान गाव व नदीच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या वस्त्या... याच वस्त्यांवरील लोकांना जर गावात यायचं असेल तर सुर नदी रोज ओलांडावी लागते... अनेक वेळा स्थानीक आमदार आणि प्रशासनाकडे नदीवर पूल बांधून देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली, मात्र आश्वासनाशिवाय त्यांना काहीच मिळालं नाही...
तुडुंब भरलेला खिंडसी डॅम त्यामुळे शेकडो शेतकरी शेतीपासून वंचित झालेले असून त्यांच्या मालकी हक्काचे शेती सुद्धा डुबलेली आहे... तसेच जनावरांना चाराला जागाही उरली नाही त्यामुळे अर्धा किमतीमध्ये जनावर विकावे लागत आहे... त्यामुळे शेतकऱ्यांच्या दुधाच्या धंद्यावर तो व्यवसाय होता तो सुद्धा आमदाराने व्यक्तिगत स्वार्थामुळे त्यांच्या रोजगार हिरावला गेला... त्यामुळे संतप्त नागरिक स्थानिक आमदाराच्या विरोधात आंदोलन सुद्धा करण्याची तयारी दर्शवलेली आहे...
विद्यार्थी व डोंगरी गावातील व इतर नजीकच्या गावातील नागरिकासह डॉ. राजेश ठाकरे यांनी पुलाची पाहणी केली, अतिशय विदारक परिस्थितीत विद्यार्थी व शेतकरी आहेत त्यामुळे शासन तसेच प्रशासनाने यावर लवकरात लवकर मार्ग काढावा असे आवाहन या संदर्भात निवेदन सुद्धा जिल्हाधिकारी यांना डॉ. राजेश ठाकरे यांनी दिले...
