स्वच्छते विषयी रोहा शहरात उदासीनता,
रोहा शहरात काही ठरलेल्या ठिकाणी दिव्या खाली अंधार या उक्तीप्रमाणे हे विदारक चित्र कायम पाहायला मिळते. रोहा नपाच्या मुख्य रस्त्यावर सार्वजनिक बांधकाम कार्यालयाच्या समोर, सरकारी रुग्णायांजवळ, मेहेंदळे हायस्कूल समोर, नाना शंकशेठ मार्गावर असा पसरलेला कचरा अनेकदा पाहायला मिळतो, नगर पालिका प्रशासाकडून दर महिन्याला आठ ते नऊ लाख रुपये कचरा आणि स्वचछतेवर खर्च केले जातात तरीही रस्त्यावर पडलेला आणि पसरलेला कचरा रोहेकरांना कायम पाहावे लागते. सुज्ञास सांगणे न लागो अस म्हणण्याची पाळी आता रोहेकर नागरिकांवर आली आहे... रोह्यातिल सामाजिक कार्यकर्ते आणि ज्येष्ठ पत्रकार दिलिप वडके यांनी सोशल मीडियावर तसेच सिटिझंसच्या गृपवर याबाबत पोस्ट टाकून तीव्र नापसंती व्यक्त केली... त्यावर अनेक रोहेकरांनी आपला संताप व्यक्त केला... नगर पालिकेने वेळीच यावर कडक उपाययोजना, नियोजन केले गेले नाही तर भविष्यात रोहा शहर आणखी बकाल होईल अशी भावना रोह्याटील सोशल मीडियावर व्यक्त झाली आहे...
प्रतिक्रिया :-
गेले अनेक वर्षे रोह्यात लाडके व्यावसायिक योजना सुरू असुन तीचा लाभ अनेक लाभार्थी घेत असल्याचे अनेकदा पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे, रोहा शहरात काही ठिकाणी कायम असा कचरा पडलेला असतो, प्लॅस्टिक कचरा आणि भाजी कचरा डंम्प करण्यासाठी प्रशासनाने जणू लाडके व्यावसायिक योजना सुरू केली आहे असे वाटते, पादचाऱ्यांना येथून नाक मुठीत धरून चालावे लागते. - दिलिप वडके, ज्येष्ठ पत्रकार
नगर पालिकेने वारंवार सांगून देखील या ठिकाणी कचरा टाकण्याचे प्रकार घडत आहेत, तेथील कचरा आता उचलण्यात आले आहे... वारंवार कचरा टाकण्याच्या समस्येवर सदर ठिकाणी नगर परिषदे मार्फत सौंदर्यीकरण करून या प्रश्नावर कायस्वरूपी उपाययोजना करण्यात येणार आहे- पंकज भुसे, मुख्याधिकारी रो.न.पा.
पालिकेच्या गोटात स्वच्छतेविषयी कायम उदासीनता दिसुन येते... पूर्वीच्या काळी अशा प्रकारे कचरा करण्याची प्रवृत्ती रोहा शहरात नव्हती, प्रत्येकजण आपापल्या परिसरात स्वच्छता ठेवीत असत... अलीकडे नगर पालिकेला कोणी वाली नसल्याने असे विदारक चित्र नागरिकांना पहावे लागते आहे...- नितीन परब, अध्यक्ष रोहा सिटिझन फोरम
