महाराष्ट्र वेदभुमी

पावसाने मारली अचानक दडी भातशेती पिक नुकसानीच्या वाटेवर,बळीराजा चिंताग्रस्त

 

कोलाड (श्याम लोखंडे): रायगड जिल्ह्यात काही ठिकठिकाणी अचानक पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांचे खरिपाचे पीक शेतात पाणी नसल्यामुळे जमिनीला भेगा पडून जिमिनीला कोरड पडल्यामुळे  भातपिक नुकसानीच्या वाटेवर दिसत आहे.. त्यामुळे बळीराजा कमालीचा चिंताग्रस्त झाला आहे...

रोहा तालुक्यातील कोलाड,खांब, देवकान्हे परिसरातील शेतकऱ्यांनी जून महिन्यात खरीप हंगामाच्या पेरणी केली तद्नंतर वरुणराजाच्या कृपेमुळे जुलै महिन्यात पेरणी केलेले रोप पूर्णत्वास त्याची लागवड देखील केली त्यात जोरदार झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेकांचे भातशेतीचे नुकसान झाले त्याचे पंचनामे सबंधित खात्याकडून करण्यात आले..माञ अद्याप त्याची बळीराजाला भरपाई नाही..तर ते प्रतीक्षेत असल्याचे समजते... मात्र, गेली सात आठ दिवसांपासून पावसाने अचानकपणे दडी मारल्याने शेतक-यांचे डोळे आता पुनः आकाशाकडे लागले आहेत...शेतात लागवड केलेल्या पिकांना पाणी नसल्यामुळे जमिनीला भेगा पडल्यात.. शेतात पाणी नसल्यामुळे लागवड केलेले रोपटे पिकांअभावी सुकून जात असल्याने मोठे संकट शेतकरी राजावर ओढवले जात असल्याची चिंता शेतक-यांना लागली आहे...


रायगड सह काही तालुक्यात पावसाचे दडी मारल्याने रोहा तालुक्यातील कोलाड,खांब, देवकान्हे परिसरातील शेतकऱ्यांनी शेकडो हेक्टरहून अधीक खरिपाची भात लागवड केली आहे.. दरम्यान, पावसाचा अंदाज घेत बँकेच्या मदतीवर अवलंबून न राहता बळीराजाने जमेल तसे जुगाड लावून तसेच काहींनी सेंद्रिय तर काहींनी रासायनिक खते वापरत वेळेवर भात लागवड केली , मधल्या काळात जोरदार पावसाने थैमान घातले त्यात काहींना नुकसान सोसावे लागले तर जुलै महिन्यात झालेल्या महापुरात अनेक शेतकऱ्यांच्या बांधाला खांडी गेल्याने मोठा नुकसान झाले असून त्यांची नुकसाभरपाई राज्य सरकारकडून पंचनामे करून अद्याप वाऱ्यावर त्यात आता मागील काही दिवसांपासून पावसाने अचानकपणे दडी मारल्याने लागवड केलेली रोपटे माना टाकत आहेत...त्यामुळे शेतकरी बळीराजा चिंताग्रस्त झाले आहे...

भातपिकांसह नाचणी वरी तीळ पीक वाया जाण्याच्या मार्गावर.

जुलैमध्ये जवळपास दहा ते पंधरा तारेखेअखेर पर्यंत अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीत भात लागवड केली... मागील वर्षी समाधानकारक उत्पादन मिळाले...मात्र, यंदा कधी वरून राजा कोपतो तर कधी रुसून बसतो त्यामुळे अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही...तर या परिसरातील बहुसंख्ये शेतकरी हे खरिपात भात लागवड करतात तर काही वर्कस भागात आजही भातशेती बरोबर नाचणी,वरी,तील, सह अधिक भाजी पाला देखील करून आपले उदरनिर्वाह चालवत असतात.. मात्र गेली अनेक दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतीला जणू कोरड पडल्यामुळे आशा पिकांचे नुकसान होत असल्याने बळीराजा चिंताग्रस्त झाला आहे...

Post a Comment

Previous Post Next Post