महाराष्ट्र वेदभुमी

कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रवेशद्वार उभारणीचेअनेक वर्षाचे स्वप्न अखेर पु्र्ण

प्रवेशद्वार उद्घाटनासह विविध विकासकामांचे भुमीपुजन

सभापती किरपान यांच्यावर कौतुकांचा वर्षाव


सचिन चौरसिया प्रतिनिधी 

रामटेक :- कृषी उत्पन्न बाजार समितीचे तरुण अभ्यासु सभापती सचिन किरपान यांनी १८ लक्ष रुपये खर्च करुन बाजार समितीसाठी सुसज्ज असे प्रवेशव्दाराची उभारणी केली. अनेक वर्षाचे बाजार समितीचे स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी सभापती सचिन किरपान व त्यांचा संचालक मंडळाने पुढाकार घेत आणि कृषी उत्पप्न बाजार समिती रामटेकचे अनेक वर्षाचे प्रवेशद्वार उभारणीचे स्वप्न अखेर साकार झाले...

कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन दि. १८ ऑगस्टला माजी राज्यमंत्री सुनील केदार, खा. शाम बर्वे तथा जि.प. अध्यक्षा मुक्ता कोकड्डे यांच्या हस्ते पार पडले... यासोबतच याच दिवशी बाजार समितीतील जवळपास आठ ते नऊ विकासकामांचे भुमीपुजनही करण्यात आले... यावेळी प्रामुख्याने पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे, उबाठाचे विशाल बरबटे, माजी खा. प्रकाश जाधव, देवेंद्र गोडबोले, सभापती सचिन किरपान आदी उपस्थित होते...

  कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेक येथे गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम सुरू होते...नुकतेच्या प्रवेशद्वाराचे बांधकाम पूर्ण झाले व दिनांक दि. १८ ऑगस्टला दुपारी १२ वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती रामटेकच्या प्रवेशद्वाराचे उद्घाटन माजी राज्यमंत्री सुनील केदार, खासदार श्याम बर्वे तथा जिल्हा परिषद अध्यक्षा मुक्ता कोकोड्डे यांच्या हस्ते पार पडले...यानंतर लगेचच हमाल भवन, शेतकरी भवन यांचेसह सात ते आठ विकासकामांचे यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले... यानंतर उपस्थित मान्यवरांचा स्वागत सत्काराचा कार्यक्रम पार पडला... दरम्यान येथे उपस्थित व्हॉईस ऑफ मीडिया शाखा रामटेक पत्रकार संघाकडूनही खासदार श्याम बर्वे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला... यानंतर भाषणाचा कार्यक्रम सुरू झाला खासदार शाम बर्वे तसेच माजी राज्यमंत्री सुनील केदार यांनी सभापती सचिन किरपान यांच्या कार्य करण्याच्या पद्धतीची स्तुती करून त्यांचेवर कौतुकांचा वर्षाव केला... पर्यटन मित्र चंद्रपाल चौकसे यांनी सुद्धा सभापती किरपान यांचे कौतुक करून येथे तयार करण्यात येणार असलेल्या शेतकरी भवन तथा हमाल भवन येथे जेवणाची व्यवस्था करावी तथा ती निशुल्क किंवा कमी दरात सुविधा करावी असे सभापती किरपान यांना सांगितले...यानंतर येथे माजी खासदार प्रकाश जाधव उभाटाचे विशाल बरबटे, देवेंद्र गोडबोले यांची भाषणे होऊन कार्यक्रम संपुष्टात आला... 

   कार्यक्रमाचे संचालन कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विरेश आष्टणकर, प्रास्ताविक त्रिलोक मेहर तथा आभार कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव हनुमंता महाजन यांनी माणले. यावेळी उपस्थितांमध्ये श्रीमती शांताताई कुमरे (सदस्य जी.प. नागपूर), श्री. स्वप्नील श्रावणकर (सभापती पं.स. मौदा), श्री. नरेशजी बर्वे, श्री. सुनिलजी रावत,  सौ. लक्ष्मीताई कुमरे (उपसभापती कृ.उ.बा. स. रामटेक), संचालक श्री. विरेश आष्टणकर, श्री. त्रिलोक मेहर, श्री. रामुजी झाडे, श्री. यशवंत भलावी, श्री. झनकलाल मरस्कोल्हे, श्री. नरेश मोहने, श्रीमति साबेराताई पठाण, श्री. नीलकंठ महाजन, श्री. नकुल बरबटे, श्री. उमेश भांडारकर, श्री. योगेश माथरे, श्री. बाबुजी वरखडे, श्री. भीमराव आंबीलढुके, श्री. विजय मदनकर, श्री. शंकर तांदुळकर व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post