महाराष्ट्र वेदभुमी

लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सानेगावात साजरी.



रुपेश रटाटे : धाटाव

 दिनांक १/८/२०२४ गुरुवार रोजी सकाळी ठीक ९.०० वा शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा सानेगाव, तालुका-रोहा, जिल्हा-रायगड...येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती असा संयुक्तिक कार्यक्रम घेण्यात आला...

           सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे माध्यमिक शिक्षक श्री सकपाळ सर यांनी केले...तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. चेंडके सर यांची एकमताने अध्यक्षपदी निवड करण्यात आली... त्यास शाळेतील शिक्षक श्री धुमाळ सर यांनी अनुमोदन दिले... तदनंतर लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला... तसेच शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री. फसाळे सर यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले... 

   शाळेतील इयत्ता पहिली ते बारावीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपले मनोगत व्यक्त केले... तर शाळेतील शिक्षक श्री.जोगळेकर, श्री. धुमाळ, श्री. सकपाळ सर यांनी मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त केले... त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व शाळेचे मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना आपल्या अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय नेत्यांचे महत्त्व समजावून सांगितले... शेवटी शाळेतील शिक्षक श्री बलकवडे सर यांनी उपस्थित सर्व शिक्षक वृंद, कर्मचारी वृंद, विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचे आभार मानले...

        सदर कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक तसेच माध्यमिक शिक्षक, प्राथमिक शिक्षक, वर्ग चार कर्मचारी उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post