महाराष्ट्र वेदभुमी

ऐन निवडणूकीचा तोंडावर होणार रामटेक विधान सभेचा सर्वागीण विकास



सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक विधानसभा क्षेत्रामधील कन्हान व पटगोवारीत होणार एमआयडीसी प्रकल्प

रामटेक :- मागील पाच वर्षात रामटेक विधानसभा क्षेत्रामधील प्रत्येक गावाचा सर्वांगीण विकास झालेला आहे... रामटेक विधानसभा क्षेत्र महाराष्ट्रात विकासाच्या बाबतीत सर्वात समोर आहे अशी माहिती रामटेक विधानसधेचे आ. अँड. आशिष जयस्वाल यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली... महाराष्ट्रातील २८८ विधानसभा क्षेत्रामध्ये रामटेक विधानसभा क्षेत्राचा जसा विकास झालेला आहे तसा विकास अजूनही कुठे झालेल्या नाही... त्यांनी सांगितले की २०१९ मध्ये निवडून आल्यानंतर दोन वर्ष कोविडमध्ये गेले त्या काळात लॉकडाऊन असून सुद्धा मी फील्डमध्ये राहून पारशिवनी  तहसील मध्ये १७०० आणि रामटेक तहसीलमध्ये १४०० राशन कार्ड बनवून नागरिकांना मोफत राशन उपलब्ध करून दिले...

पुढे आमदार ऍड आशिष जयस्वाल यांनी सांगितले की महाराष्ट्राची अयोध्या असलेली रामटेक येथील प्रभु श्रीरामचंद्राच्या गडमंदीर येथील विविध पुरातन इमारतीचे जतन व दुरुस्ती करीता (१) वराह दरवाजा (२) शिरपूर दरवाजा (३) भैरव दरवाजा (४) गोकुळ दरवाजा (५) इंद्र नृसिंग मंदीर (६) राम, लक्ष्मण, मंदिर व रामकुंड (७) गडमंदिर येथे मुलभूत सुविधा पूरविण्याकरिता एकुण १३ कोटी पेक्षा जास्तनिधी मंजुर करण्यात आला...

रामटेक क्षेत्रात सर्वात जास्त पानदान रस्ते निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठीती रामटेक क्षेत्रात सर्वात जास्त प्राधान्य निर्माण करून शेतकऱ्यांना त्यांच्या शेतापर्यंत पोहोचण्यासाठी मदत झालेली आहे... समोर संपुर्ण पानदान रस्ते हे सिमेंटकरण चे करण्यात येईल असे सांगण्यात आले...

आतापर्यंत खनिज निधीच्या माध्यमातून दवाखाना आपल्या दारी हा कार्यक्रम सुरू करून आतापर्यंत ६४ हजार लोकांना त्यांची मोफत शारीरिक तपासणी करण्यात आली तसेच तीस हजार लोकांना चष्मा वाटप करण्यात आलेले आहे...

महाराष्ट्र राज्य परिवहन निगमच्या बसमध्ये कमतरता असल्याबाबत त्यांनी सांगितले की राज्य सरकारला इलेक्ट्रिक बस खरेदीच्या ऑर्डर दिला गेलेला आहे म्हणून डिझेल पासून चालणाऱ्या बसेना खरेदी केलेली नाही...

रोपवेनिर्माण कार्याबद्दल त्यांनीांगितले पर्वतमाला योजना अंतर्गत रोप् वे चे निर्माण कार्य एक हप्त्यांमध्ये चालू होणार आहे हा रोपवे चेरी फॉर्म पिपरिया पेठ मधून सुरू होऊन गडमंदिर परिसरात अगस्त मुनी आश्रम येथे लँडिंग होणार आहे... अंबाळा परिसरात पाच करोडची विद्युत सजावट तीर्थक्षेत्र अंबाळा येथे फार दुरून दुरून यात्रे करू येतात तसेच अंबाळा परिसराला आकर्षक बनविण्यासाठीतसेच अंबाडा परिसराला आकर्षक बनविण्यासाठी जसे राम मंदिर चे लाइटिंग सुविधा केलेली आहे तशीच लाईट सुविधा आणि सजावट अंबाळा परिसरात करण्यात येणार आहे...

रामटेकमध्ये कीती तरी वर्षा पासुन रेल्वेची सुविधा उपल्बध असुन त्या प्रमाणे रामटेक रेल्वेस्टेशनचा विकास झाला नसुन आमदार साहेबांना विचारणा केली असता त्यांनी सरळ म्हटले की रामटेक रेल्वे हा माझा विषय नसुन तो भारत सरकार चा विषय आहे त्यात मी काही करु शकत नाही असे त्यांनी म्हटले...

 १५ करोड रुपये नवीन बस स्टँड साठीराज्य परिवहन निगम चे बस स्टॅन्ड फार जुने झालेले आहेफार जुने झालेले आहेत येथे यात्रेकरूंना उभे राहण्यासाठी फारत्रास होतो त्यासाठी नवीन बस स्टँडचे निर्माण कार्य साठी १५ करोड रुपये राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आलेले आहे...राज्यातील हे बस स्टॅन्ड पहिले असणार आहे जे आकर्षक असून आपल्या संस्कृतीचे प्रदर्शन करणार आहे...

 रामटेकमध्ये एमआयडीसीचे निर्माणकार्य

रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये पडगोवारी ग्रामपंचायत आणि तहसील मध्ये एकूण तीन हजार एकर जमिनीचे अधिग्रहणाचे कार्य चालू केलेले आहे पुढे जैस्वाल यांनी सांगितले की रामटेक तीर्थक्षेत्र विकासासाठी २०० करोड रुपये देण्यात आलेले आहे... २०० करोड रुपये देण्यात आलेले आहे त्यातच ३००० करोड रुपयाची निधी रामटेक विधानसभा क्षेत्राच्या विविध भागाच्या विकासासाठी मंजूर करण्यात आलेली आहे त्याचे भूमिपूजन लवकरात लवकर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताने होणार आहे अशी माहिती आमदार जयस्वाल यांनी दिली...

पत्रकार परिषदेत तालुकप्रमुख विवेक तुरक, शहरप्रमुख राजेश किंमतकर, जिल्हा परिषद सदस्य संजय झाडे, माजी नगरसेवक बिकेंद्र महाजन, माजी नगरसेवक सुमित कोठारी, हरिदास उर्फ बंडू सांगोडे, धर्मेश भागलकर, इत्यादी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post