अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे बुधवार दि.१७ जुलै रोजी मोहरमच्या दहाव्या दिवशी ताजियाची विसर्जन मिरवणुक काढण्यात आली होती, सोगाव गावातून निघालेली मिरवणूक पूर्ण मूनवली गावातून येत सोगाव कब्रस्थान येथे विसर्जित करण्यात आली... यावेळी मोहरम निमित्ताने निघालेल्या ताजियाचे अनेक हिंदू बांधवांनी दर्शन घेतले...
मोहरम सण व ताजियाची विसर्जन मिरवणुक अत्यंत शांततेत पार पडली... यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव अलिबाग पोलिसांनी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता... मोहरम यशस्वी होण्यासाठी जमातुल मुस्लिमीन सोगाव कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सेक्रेटरी व इतर सदस्यांनी तसेच ग्रामस्थांनी मेहनत घेतली...
फोटो लाईन : सोगाव येथे मोहरम निमित्ताने ताजियाची निघालेली मिरवणूक
