महाराष्ट्र वेदभुमी

अविरतपणे चालणारे कोमसाप मधुबन कट्ट्याचे १०५ वे कविसंमेलन भर पावसातही संपन्न


उरण/ १८ जुलै/अजय शिवकर

कविसम्मेलनातून घेतला वारीचा आनंद - दत्ताराम निळवर्ण 

उरण तालुक्यात १७ तारीख कोमसापच्या कविसम्मेलनाची तारीख.योगायोगाने या १७ तारखेला आषाढी एकादशीची वारी आल्याने शाखेचे अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे यांनी " विठ्ठल भक्ती

" या विषयावर कविता वाचनाचे आवाहन केले होते.त्यानुसार विमला तलाव उरण येथे झालेल्या कविसम्मेलनात कवींनी भक्तिमय कविता सादर करून रसिकांना वारीचा आनंद दिला,असे मत कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नागरिक दत्ताराम निळवर्ण यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात मांडले.यावेळी महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य रायगड भूषण प्रा एल बी, चंद्रकांत मुकादम,भिका अहिरे, सुनिल पाटील,तानाजी शहाजी, अरविंद घरत, विकास पुरो इ.यांची प्रमुख उपस्थिती होती...

       वारी,रिंगण,विठ्ठल,रखुमाई,चंद्रभागा, ज्ञानेश्वर, तुकोबा यांच्या कविता गाऊन भक्तीमय वातावरण निर्माण झाले.या वातावरणात मधुबन कट्ट्याचे अध्यक्ष श्री .रामचंद्र म्हात्रे,श्री.म.का. म्हात्रे,श्री.मारूती  तांबे, श्री.अजय शिवकर,श्री.संजय होळकर, श्री.हेमंत पाटील,श्री. न.ग. पाटील,श्री.संग्राम तोगरे,कु.अनुज शिवकर, श्री.भगवान म्हात्रे इत्यादींनी कविता गाऊन सादर केल्या...

    यावेळी उरणातील सुप्रसिद्ध नृत्यकलाकार पपन पाटील, पेणच्या नृत्यांगना रिध्दी चिंबुलकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाचे सुरेख 

सूत्रसंचालन श्री.संजय होळकर यांनी करून कार्यक्रमाला रंगत आणली...

Post a Comment

Previous Post Next Post