महाराष्ट्र वेदभुमी

आवरे गावात घुमला विठू नामाचा गजर

 


उरण प्रतिनिधी( शंकर पाटील)

सांस्कृतिक परंपरा असलेलं हे आवरे गाव ...आयुष्यात पंढरीची वारी एकदा तरी करावी... कारण शत जन्माचे सार्थक होई... जेव्हा पंढरीच्या वारीचा संकल्प करून तो पूर्णत्वास नेऊ... आषाढी एकादशीचे महत्व जाणून घेत वर्षातील २४ एकादशी पैकी आषाढी एकदशीचे महत्व काय आहे?.. या साठी आवरे येथील विठ्ठलरखुमाई मंदिरात विठ्ठल नामाचा जयघोषात संपूर्ण आवरे परिसर निनादून निघाले...
    आवरे येथील रखुमाई मंदिर येथे अगदी पहाटे पासून ते संध्याकाळ पर्यन्त विठ्ठल भक्त यांची जणू काही मंदियाली आली होती... गाव तसेच पंचक्रोशीतील विठ्ठल भक्त , शालेय दिंड्या तसेच मंदिरात आषाढी एकादशीचे महत्व सांगणारे सामाजिक प्रबोधनकार , वृक्षदिंड्या तसेच भजन कीर्तन प्रात: काकड आरती व साय. आरती विठ्ठल भक्तांच्या उपस्थितीत पार पडली..
     अशा अनेक कार्यक्रमात आवरे येथील विठ्ठल भक्तांचे श्रध्दास्थान असलेल्या विठ्ठल रखुमाई मंदिरात अखंड जयघोष चालला... सर्व विठ्ठल भक्तानी मनोभावे विठ्ठल मंदिरात जाऊन विठुरायाचे दर्शन घेतले.. तसेच वारीची परंपरा  कोणी सुरू केली...अश्या अनेक आख्यायिका,अनेक संतांचा उल्लेख आढळतो... त्यापैकी  माऊली संत ज्ञानेश्वर महाराज यांनी वारी  सुरू केली... ज्ञानेश्वरी लिहिल्या नंतर वारीच्या माध्यमातून भागवत धर्माचा प्रसार  व्हावा...  व पांडुरंगाचे  दर्शन व्हावे... या साठी वारी हे प्रमुख माध्यम होय... याच अनुषंगाने भक्तिमय वातावरणात आवरे गावात विठू नामाचा गजर घुमला..

Post a Comment

Previous Post Next Post