माणगाव :- (नरेश पाटील)
शहरातील हरवलेला एक निरागस बालक तत्पर शोधण्यास माणगाव पोलसांनी जिगरबाज कामगिरी करून आज पुन्हा एकदा ते कौतुकास्पदास पात्र ठरले आहेत...
याबाबत अधिक माहिती गुरुवार (दी. ०४जुलै रोजी सकाळी शेजारील ढालघर फाटा येथील रहिवासी असलेले सुनिल देवानंद सिंग कामानिमित्त बाजारात आपल्या तीन वर्षाच्या मुलाला आपल्याबरोबर घेऊन आले होते... मात्र दुकानातील खरीदीच्या कामात व्यस्थ असताना आपला बरोबरील आणलेला लहान मुलगा नजर चुकूवून पुढे निघुन गेला...हे थोड्या वेळात त्याच्या लक्षात आले.. आपला बालक कुठे दिसत नाही... आणि तोवर आपला बाळक हरवल्याचे बाब लक्षात येताच ते गोंधळून गेले...
ही बाब परिसरात लोकांना समजतास माणगाव पोलीसांना कळविण्यात आले... या विषयाची गंभीरता ओळखून माणगाव पोलीसांचे तात्काळ एक पथक घटना स्थळी दाखल (कचेरी रोड) होवुन येतील परिसरात शोध मोहीम हाती घेतली... व काही वेळातच हरवलेला तीन वर्षाचा मुलगा पोलीसांच्या नजरेत दिसला असता पोलीसांनी सदर बालकला आपल्या ताब्यात घेऊन त्याचे पालक सुनिल देवानंद सिंग यांना पोलीस ठाण्यात बोलावून त्याचा ताब्यात दिले... तर माणगाव पोलीसानी आपला हरवलेला मुलगा शोधून दिल्याबद्दल सिंग यांनी माणगाव पोलीसांचे मनस्वी आभार मानले...व त्याचा आनंद द्विगुणित केल्याबद्दल पोलीसांचे कौतुक केले...
सदर घटनेत पो.शि. बांडे, पो.शि. डोईफोडे, पो.शि. शिंदे तसेच पो.शि. शेरकर यांनी उत्तम अशी मोलाची कामगिरी केली... यासाठी माणगावकरानी माणगाव पोलीसांचे भरभरून कौतुक व अभिनंदन केले...माणगाव पोलीसांचे या तत्परता दक्ष अतुलनीय कार्याला सलामी....आणि त्यांचे कौतुक करावे तितकेच कमी...
