महाराष्ट्र वेदभुमी

एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूर विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश



सिकंदर आंबोणकर प्रतिनिधी 

इंदापूर, दि.४ जुलै-२०२४  एस. एस. निकम इंग्लिश स्कूल इंदापूर मध्ये  राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने आयाेजित केलेल्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इयत्ता ८ वी) या परीक्षे मध्ये इयत्ता पाचवीचे २० आणि आठवीचे १२ असे एकुण ३२ विद्यार्थी शिष्यवृत्तीस बसले होते. त्यामध्ये एकूण १९ विद्यार्थी पात्र ठरले आहेत. इयत्ता पाचवीमधून कु.ओमकार सालदुल हा शिष्यवृत्तीस पात्र ठरला आहे. तसेच इयत्ता आठवी मधून कु. गार्गी धुत्रे, लक्ष्मी खत्री, अनन्या कुळकर्णी, श्रेया नवगणे, वेदिका उतेकर, रिशिका यादव, प्राप्ती कदम, आर्या म्हशिलकर, वेदांत पारधी, सनी जैन, हे विद्यार्थी शिष्यवृत्तीस पात्र ठरले आहेत.या सर्व विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश मिळवले. या यशाबद्दल माणगाव एज्युकेशन ट्रस्टचे पदाधिकारी व शाळेच्या मुख्याध्यापिका, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कौतुक व अभिनंदन केले...

Post a Comment

Previous Post Next Post