उरण/पनवेल (अजय शिवकर)
रायगड जिल्ह्यातील सर्व सेवानिवृत्त शिक्षकांचे प्रश्न सोडवण्यासाठी संघटना सर्वतोपरी प्रयत्न करत असून देखील अधिकारी फक्त पुढा-याप्रमाणे आश्वासन देतात त्यामुळे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सुटणार की नाही अशी शंका येते परिणामी गटविमा फंड उपदान अंशदान रकमा निवडश्रेणी या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून प्रश्न सोडवावे अन्यथा जिल्ह्यातील सेवानिवृत्त शिक्षक ठिय्या आंदोलन करून प्रश्न सुटल्याशिवाय उठणार नाहीत असे सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमरचंद पाटील यांनी सभेत केले..
अखिल उरण तालुका प्राथमिक शिक्षक सेवाभावी संस्थेची सभा स्वर्गीय छ. ल. पाटील गुरुजी यांच्या निवासस्थानी सावर्डे येथे आयोजित करण्यात आली होती...
या सभेचे अध्यक्षस्थान ध.प. पाटील गुरुजी यांनी स्वीकारले कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा सेवानिवृत्त संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमरचंद पाटील जिल्हा सरचिटणीस गुरुनाथ पाटील जिल्हा कोषाध्यक्ष जगन्नाथ मोकल जिल्हा कार्याध्यक्ष परशुराम म्हात्रे जिल्हा सल्लागार प्रभाकर म्हात्रे ,महिला प्रतिनिधी उज्वला निकम,पेण तालुका अध्यक्ष रविकांत ठाकूर उरण तालुका अध्यक्ष अभिमन्यू गावंड पनवेल तालुका अध्यक्ष नरेश पाटील सावर्डे सरपंच शेखर पाटील कोकण कामगार नेते शैलेश पाटील रायगड जिल्हा परिषद शिक्षण विभाग वरिष्ठ लिपिक राजेंद्र म्हात्रे पत्रकार धनाजी घरत प्रदीप म्हात्रे पांडुरंग म्हात्रे गजानन गायकवाड यांच्यासह आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते..
प्रारंभी गणेश पूजन करून व छ.ल.पाटील गुरुजी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली उरण येथील यशस्वी शिंदे या मुलीची निर्गुण हत्या झाली या निषेधार्थ भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थित मान्यवरांचे शाल श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी पत्रकार धनाजी घरत आणि रायगड जिल्हा परिषदेचे वरिष्ठ लिपिक राजेंद्र म्हात्रे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना राजेंद्र म्हात्रे यांनी सांगितले की सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे जे प्रश्न प्रलंबित आहेत ते सर्व प्रश्न रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरात लवकर सोडवण्यासाठी मी सहकार्य करणार असे सांगितले. तसेच कोकण कामगार आघाडीचे शैलेश पाटील यांनी सांगितले की आज महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना लाडका भाऊ योजना अनेक योजना होऊ घातल्या आहेत मात्र माझ्या शिक्षक बांधवांचे जे प्रलंबित प्रश्न आहेत व ज्या समस्या आहेत त्या पहिल्या प्रथम सोडवा नंतरच इतर ज्या काही योजना आहेत त्या योजना घ्याव्यात असेही सांगितले. तर राज्य प्रतिनिधी रविकांत ठाकूर यांनी सांगितले की संघटनेला नवी उभारी आणि बळ मिळण्यासाठी आपण सर्वांनी हातात हात घालून काम करू या आणि संघटनेच्या कार्याला हातभार लावून संघटनेच्या माध्यमातून प्रश्न सोडवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करू या असे सांगितले...महिला प्रतिनिधी उज्वला निकम यांनी सांगितले की संघटनेला बळ द्या संघटना मजबूत करा संघटनेच्या सोबत राहून काम करत रहा साथ देऊ या नेहमी संघटनेची कदर करत रहा...ध्येय निश्चित करून काम करण्याची सवय लावा असे सखोल मार्गदर्शन केले...अध्यक्ष भाषणामध्ये ध प पाटील गुरुजी म्हणाले की आज सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांचे अनेक जे काही प्रलंबित प्रश्न आहेत किंवा त्यांच्या ज्या काही मागणी आहेत त्या महाराष्ट्र शासनाने आणि रायगड जिल्हा परिषदेने लवकरात लवकर सोडवाव्यात असे आवाहन केले...उत्तम सूत्रसंचालन गजानन गायकवाड यांनी केले...