महाराष्ट्र वेदभुमी

एम.ई.सी.बी.कर्मचाऱ्याची दुचाकी गेली चोरीला


सचिन चौरसिया प्रतिनिधी

 रामटेक :- तालुक्यात दिवसेंदिवस चोरीचा घटना वाढत चाललेल्या आहे.... शहरातील एका नामांकित हॉस्पीटल समोर उभी असलेली दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना नुकतीच २५ जुलै च्या सायंकाळी साडेसात वाजता दरम्यान घडली..

        दुचाकी मालकाचे नाव जावेद अली निशार अली शेख वय ४२ असुन ते एम.ई.सी.बी.विभागात कार्यरत आहे... शहरातील महात्मा गांधी वार्ड येथे ते राहतात...नुकतेच २५ जुलै ला सायंकाळी साडेसात वाजता शहरातील रिआन हॉस्पीटल येथे जावेद शेख हे आपल्या होंडा सी.बी. शाईन एम.एच. ४० बी.एच. ४६८८ क्रमांकाच्या दुचाकीने एका रुग्णाला भेटण्यासाठी गेले होते... दरम्यान त्यांनी आपली दुचाकी हॅन्डल लॉक न करता रुग्णालयाच्या बाहेर उभी ठेवली व ते आतमध्ये भेटण्याकरीता गेले असता तेवढ्यातच चोरट्यांनी आपली हातसफाई दाखवित जावेद शेख यांची दुचाकी चोरून नेली...

     रुग्णालयातुन बाहेर आल्यावर लक्षात येताच जावेद शेख यांनी पोलीस स्टेशन रामटेक येथे धाव घेत तक्रार नोंदवली... रामटेक पोलीसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा नोंद करून तपास सुरु केलेला आहे... सदर घटना हाँस्पीटल मधील सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post