महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई-गोवा हायवे मार्गांवर ठेकेदाराच्या चुकीच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी

पुगाव - खांब  (नंदकुमार कळमकर) 

पुई पुलावर गर्डर बसविण्याच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी प्रवाश्यांचा खोळंबा

मुंबई-गोवा महामार्गांवरील कोलाड (पुई )येथील महिसदरा नदीच्या पुलावर गर्डर बसविण्याचे काम सुरू असून ते ठेकेदार यांच्या चुकीच्या नियोजनामुळे सकाळी ९.३० पासुन १२.३० पर्यंत सुमारे तीन तास वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असुन चक्का जॅम त्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असल्याने याचा त्रास वाहनचालकांसह अनेक प्रवासी वर्गाला सहन करावा लागला असल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे...

मुंबई व गोवा महामार्गावर कोलाड पुई येथील महीसदरा नदी पात्रावर नवीन पुलाचे गर्डर बसविण्याचे कामाची सुरवात करण्यासाठी ११ जुलै  ते १३ जुलै या दरम्यांतील  सकाळी ६ ते ८ व दुपारी २ ते ४ वाजण्याच्या या वेळेत फक्त चार तास सर्व प्रकारची वाहतूक या ठीकाणांहून बंद राहणार आहे.असे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते परंतु शुक्रवारी १२ जुलै रोजी सकाळी ९.३० वाजता अचानक काम सुरु केल्यानंतर वाहतूक दारांना कोणतेही पुर्व सूचना नसल्यामुळे मार्गावर वाहतूक सुरु होती परंतु या कामामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत येथील पुई ते खांब या दरम्यान जवळपास तीन किलोमीटर लांब चक्का जॅम झाला असल्याने वाहनचालकांसह प्रवाशी वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागल्याने मोठा संताप अनावर झाला असल्याचे समजते तर मार्गांवरील धावणाऱ्या वाहनांना पर्यायी मार्ग देण्यात आले असून त्याचा वापर वाहन चालक यांनी करण्याचे आवाहन पोलीस विभागाकडून करण्यात आले असून नवीन उभारण्यात येणाऱ्या या पुलावर गर्डन बसविण्याची जय्यत तयारीनिशी संबधीत यंत्रणा सज्ज झाले असल्याचे दिसून येत आहे.मात्र दिलेल्या ठराविक वेळेनुसार तसेच ठेकेदाराच्या निष्काळजी पणाच्या धोरणांमुळे ही वाहतूकोंडीमुळे तसेच प्रवाशी वर्गाला हा त्रास सहन करत त्यांची हेळसांड झाल्याचे दिसून आले...


ठेकेदार यांच्या चुकीच्या नियोजनामुळे वाहतूक कोंडी याला जबाबदार कोण?

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कल्याण टोल इन्फा. कंपनीतर्फे पुई येथील महीसदरा नदी पात्रावरील नवीन ब्रिजचे गर्डर बसविण्याचे काम दिले असून या गर्डर बसविण्याचे काम ठराविक ११ जुलै ते १३ जुले रोजी सकाळी ६ वा. ते ८ व दुपारी २ वा. ते ४ वा.या दरम्यान रोज करण्यात येणार असल्याची नियोजीत कामाचे वेळ ठरली होती व यावेळेत मुंबई-गोवा या राष्ट्रीय मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात येईल असे सांगण्यात आले होते परंतु ती वेळ अचानक बदलल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होऊन प्रवाश्यांचा तीन ते चार तास खोलंबा झाल्यामुळे प्रवाशी वर्गातून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post