सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक विधानसभेतील नेत्यांची रामटेक - खात रेल्वेमार्गाकडे पाठ
असे नेते काय कामाचे जनतेने ओकली भडास
रामटेक -:स्वातंत्र्याच्या सात दशकांनंतर बहुप्रतिक्षित रामटेक-तुमसर टाऊन रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाला हिरवी झेंडी मिळाली असून आज रामटेक रेल्वे स्टेशन सांगत आहे..आपली गाथा सर्व सामान्य माणसाकरिता रेल्वे हे प्रवासाचे सर्वात सुरक्षित आणि किफायतशीर साधन मानले जाते... एखाद्या गावासाठी रेल्वे मार्ग उपलब्ध असणे, प्रगतीचे व रोजगाराचे अनेक मार्ग उघडवणारा विषय असतो...याउलट रेल्वेची सुविधा नसणे कित्येक अडचणींचे मूळ असते... शासनाच्या दृष्टीने रेल्वेचे जाळे लोकसेवा आणि उत्पन्न दोन्ही दृष्टीने मोठी उपलब्धी मानली जाते...नागपुरच्या इतवारी येथुन रामटेकला रेल्वे येत असते मात्र ती पुढे रेल्वेमार्ग नसल्याने ती पुढच्या स्टेशनला न सरकता आल्यापावली परत जाते... हिच बाब रामटेकवासीयांसाठी दुर्दैवाची ठरत आहे...रामटेक विधानसभा क्षेत्रात ढिगभर नेते आपला ससेमिरा मिरवत असले तरी मात्र रामटेकपासुन पुढे खात रेल्वे स्टेशन पर्यंतचा अवघा २५ कि.मी. चा मार्ग जोडण्याकडे त्यांनी पाठ फिरविली असुन एकमेकांचा पाय मागे खेचण्यातच ते धन्यता मानत असल्याचे चित्र आहे... तेव्हा असे नेते काय कामाचे असे बोलत नागरीक सुद्धा आपली भडास अक्षरशः ओकत आहे...
कागदोपत्री घोडे नाचवुन जनतेला नुसत्याच भुलथापा
रेल्वे मार्गाची निर्मिती हा काही सहज सोपा विषय नाही. जनप्रतिनिधीसाठी नव्या लोहमार्गाच्या निर्मितीचे आश्वासन देणे सोपे आहे परंतु ते कृतीत उतरवणे महाकठीण असते. हे जरी मान्य केले तरी मात्र शेकडो किलोमिटर चे रस्ते बनविण्यासाठी कित्येक जमीनी अधिग्रहन केल्या जावु शकतात, हजारो वृक्षांची कत्तल करता येवु शकते, कित्येक अडथळे उपटुन फेकले जातात.. तेव्हा अवघा २५ कि.मी. चा रेल्वेमार्ग बनवता येत नाही का ? हा प्रश्न उभा ठाकला आहे... सध्या सर्वच रेल्वेमार्ग नव्वद टक्के तयार आहे... ना सर्वेक्षणाची गरज,ना भूसंपादनाची कार्यवाही,ना विद्युतीकरण खर्च ! रामटेक ते नागपूर रेल्वेमार्ग विद्युतकरणासह उपलब्ध आहे... नागपूर ते वर्धा मार्ग तिसऱ्या ट्रॅकसह सुरू होत आहे...वर्धा ते चंद्रपूर मार्ग सुरू आहे... चंद्रपूर ते गोंदिया या संपूर्ण आदिवासी टप्प्यातील रेल्वेमार्गावर सुद्धा गाड्या सुरू आहेत... गोंदिया ते खात हा मुंबई कोलकाता मार्गाचा एक लहानसा सेगमेंट आहे... आता फक्त खात ते रामटेक असा केवळ पंचवीस की. मी. लांबीचा मार्ग तयार केला तर सलग सहाशे पन्नास की.मी. लांबीचा लोहमार्ग साधल्या जातो...
रामटेक - नागपूर - वर्धा - चंद्रपूर - मूल - सिंदेवाही - ब्रह्मपुरी - वडसा देवळगाव - गोंड उमरी - सौदड - गणखेरा - गोंदिया - खात आणि रामटेक असा चक्राकार मार्ग सहज पणे तयार होवू शकतो...खर तर तो तयारच आहे...दोन चार महिन्यांच्या तयारीत या मार्गावर सलगपणे क्लॉक वाईज आणि अँटी क्लॉक वाईज अशा दोन्ही दिशेने गाड्या सुरू करता येतात...यात रेल्वेचा सुद्धा प्रचंड फायदा आहे... प्रवाशी भाडे आणि माल वाहतूकीचा लाभ वेगळाच! मग इतका सहज,साधा,अल्प खर्चाचा रेल्वे प्रकल्प का शक्य नाही...
रेल्वेमार्गप्रश्नी एकाही नेत्याचे आंदोलन नाही
रेल्वे अधिकाऱ्यांना अक्कल नाही आणि ढिगभर नेत्यांना जनतेच्या प्रश्नांची जाण नाही जणु असेच चित्र पहावयास मिळत आहे...रेल्वेमार्ग पुढे खात पर्यंत सरकवण्यासाठी, भिडवण्यासाठी एकाही नेत्याने कार्यकर्ते व नागरिकांना हाताशी घेऊन रेलवे ट्रॅकवर आंदोलन केले नाही... सर्वच जणु फक्त कागदोपत्री निवेदनांचे घोडे नाचवुन भोळ्या भाबड्या नागरीकांना भुलथापा मारण्याचा व त्यातुन आपल्या ' व्होट बँक मध्ये भर पाडण्याचा ' मार्ग सुकर करतांना दिसत आहे... मात्र नागरीकांनी आता यातुन काही बोध घेत येत्या विधानसभा निवडणुकीत ' या ' ढिगभर नेत्यांना त्यांची जागा तथा त्यांची लायकी दाखवुन द्यावी तेव्हाच ते सुधारेल असे परखड मत काही सुज्ञ नागरीकांनी बोलून दाखविले आहे...
