महाराष्ट्र वेदभुमी

साहित्यिक अजय शिवकर यांना महाराष्ट्र भूषण व जीवन गौरव पुरस्कार मिळणार


 मुंबई/३०जुलै /उरण प्रतिनिधि

 साहित्य क्षेत्रामध्ये विशेष आणि उल्लेखनीय कार्य तसेच पत्रकारित्यांमधून जनसामान्यांना न्याय, व सामाजिक क्षेत्रामध्ये सहभाग घेणारे रायगड जिल्ह्यातील केळवणे पनवेल येथील कवी-लेखक श्री.अजय शिवकर यांना महात्मा कबीर समता परिषद नांदेड यांचा महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला आहे... 

कवी लेखक श्री अजय शिवकर गेल्या पंचवीस वर्षापासून उरण तालुक्यात सामाजिक क्षेत्रात विशेष कार्यरत आहेत... कविता आणि लेखनाच्या माध्यमातून ते समाज जनजागृतीचेही कार्य करतात...

    महाराष्ट्र वेदभुमी व इतर विविध प्रसार माध्यमातून पत्रकारित्या करून अन्यायाला वाचा फोडून जन सामान्याला न्याय मिळवून देण्याचे काम करतात...

स्वच्छता, ग्रामसुधारणा, वृक्षारोपण, ज्येष्ठ नागरिक सहभाग अशा अनेक सामाजिक कार्यात सहभाग आणि लिखाण करून सामाजिक प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करतात...

अजय शिवकर यांना या अगोदरही कित्येक ठिकाणी पुरस्कार आणि सन्मानित केले आहे... त्यापैकी राज्यस्तरीय कवी सन्मानपत्र,उरण कलारत्न, कोमसाप जीवन गौरव, कुलाबा जीवन गौरव विशेष आहेत...ते सध्या कोमसाप शाखा उरण सचिव म्हणून कार्यरत आहेत...

शिवकर यांना महात्मा कबीर समता परिषद कडून २०२३-२०२४ चा महाराष्ट्र भूषण व जीवनगौरव पुरस्कार जाहीर झाला असून नांदेड येथे १४ ऑगस्टला मान्यवरांचे हस्ते पुरस्कार सोहळा वितरण होणार असल्याचे  परिषदेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. मुकुंदराज पाटील यांनी पुरस्कार घोषित झाल्याचे पत्र पाठवले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post