महाराष्ट्र वेदभुमी

१८ वर्षानंतर मेढा हायस्कूलचे मित्र-मैत्रिणी एकत्र, श्री.जोशी सरांना पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य

धाटाव : रुपेश रटाटे 

रोहा तालुक्यातील मेढा हायस्कूल येथील इयत्ता १० वी पास सन २००६ मधील बॅचचा गेट टूगेदर कार्यक्रम रविवार दि.२८ जुलै २०२४ रोजी निसर्गाच्या सानिध्यात मोठ्या संख्येने मित्र- मैत्रिणींच्या उपस्थितीत जल्लोषात संपन्न झाला...

  गेल्या १९ वर्षा नंतरची मैत्री भेट,स्नेह मेळावा म्हणजे विखुरलेले मित्र मैत्रिणी एकत्र करणे,व सर्वांच्या सुख दुःखात सहभागी होऊन सर्वाना सोबत घेऊन पुढे जाणे हाच आत्मिक भाव होता... यावेळी मात्र उपस्थित सर्वांचाच आनंद गगनात मावत नव्हता...

    या कार्यक्रमात अनेकांनी आपल्या जून्या आठवणींना उजाळा दिला.. तर काहींनी ९० च्या दशकातील आम्ही मित्र- मैत्रिणी मोबाईल व सोशीयल मिडिया नसल्यामुळे आम्ही विखुरले गेलो होतो.. हे सुद्धा आवर्जून सांगितले... १८ वर्षांचा दुरावा आम्हांला दूर करायचा होता...आम्ही मराठी माध्यमातून शिक्षण घेऊन आमच्यातलेच मित्र-मैत्रिणी आज देशातच नव्हे तर विदेशात देखील चांगल्या पदावर कार्यरत आहेत... याचा आम्हाला अभिमान वाटतो...इयत्ता १० वी नंतर पूर्णतः विखुरले गेलेलो आम्ही मित्र-मैत्रिणी आज १८ वर्षांच्या प्रदिर्घ काळानंतर या सोशीयल मिडियामुळे एकत्र आलो... 

     या स्नेह मेळाव्यात तब्बल ३५ ते ४० मित्र-मैत्रिणी उपस्थित होते... सर्वांनी स्वतःचे मनोगत व्यक्त केले.. व आपण इयत्ता १०वी नंतर काय केलं? व आता काय करतो आहोत? यावर विचारपुस झाली..

  आमच्या आता पर्यंतच्या आयुष्यात असा स्नेह मेळावा कधी झालाच नाही... या स्नेह मेळाव्यासाठी आलेले  मित्र-मैत्रिणीं  आणि श्री जोशी सर यांच्या चेहऱ्यावरील आनंद गगनात मावेनासा झाला होता... सर्वांच्या एकत्रित गप्पा-टप्पा,गाण्याच्या भेड्या,धमाल मस्तीने सर्वच भारावून गेले...

 हा दिवस म्हणजे उपस्थित सर्वांच्या जीवनातील सोनेरी अक्षरात लिहून ठेवावा असाच काहीसा होता... दुपारचे जेवण करून त्यानंतर परिसरात वृक्षारोपण करून श्री जोशी सर यांना सन्मानित करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post