महाराष्ट्र वेदभुमी

खिंडसी जलाशयात पुन्हा एका तरुणांने केली आत्महत्या


सचिन चौससिया प्रतिनिधी

तीन महिन्यात ६ वी घटना

रामटेक :- नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या खिंडसी जलाशयात पुन्हा एकदा एका ३७ वर्षीय युवकाने उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि.२५ जुलै रोजी सकाळी उघडकीस आली... गेल्या ३ महिन्यात सहा घटना खिंडसी जलाशयातील घडल्या असून ही सातवी घटना असून आत्महत्या करणाऱ्यांसाठी खिंडसी जलाशय मृत्युचे स्थान ठरत आहे...

प्राप्त माहितीनुसार,महात्मा फुले वॉर्ड रामटेक येथील राकेश हनुमान राकुंडे वय ३७ वर्ष. हा आपल्या दुचाकी क्रमांक एमएच ४० एएच ०६८० हिने खिंडसी जलाशयाकडे आला... त्याने स्वतःची दुचाकी मार्गाच्या कडेला लावून जलाशयात उडी घेतली... सकाळच्या सुमारास परिसरातील लोकांना जलाशयात एका व्यक्तीच्या मृतदेह तरंगताना दिसून आले... त्यांनी तत्काळ रामटेक पोलीस व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन टीम यांना माहिती दिली...क्षणाचाही विलंब न करता रामटेक पोलीस व वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन टीम यांनी घटनास्थळ गाठले.. व मृतदेह पाण्याच्या बाहेर काढून उत्तरीय तपासणी करिता उपजिल्हा रुग्णालय रामटेक येथे आणले असून रामटेक पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास रामटेक पोलीस करीत आहेत..

Post a Comment

Previous Post Next Post