माणगांव :- (नरेश पाटील)
पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनीने रा.जि.प. शाळा वाकी आदिवासीवाडी शाळेचे नुतनीकरण यशस्वीरीत्या पूर्ण केले... ही शाळा नैसर्गिक आपत्तीमध्ये मोडकळीला आली होती, दुर्लक्षित असलेल्या या शाळेचे काम पोस्को कंपनीने हाती घेतले आणि यशस्वीरित्या पूर्ण केले... तर दि.२४ जुलै रोजी नुतनीकरण केलेल्या शाळेचा उद्घाटन समारंभ आनंददायी वातावरणात पार पडला... प्रसंगी पोस्को कंपनीचे विविध अधिकारी, विध्यार्थी, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, सरपंच, उपसरपंच आदी मान्यवर उपस्थित होते...कार्यक्रमात बोलताना, पोस्को कंपनीचे उपव्यवस्थापकीय संचालक यांनी कंपनीच्या शिक्षण आणि एकूण स्थानिक परिसराच्या विकासाच्या वचनबद्धतेवर भर दिला... ते म्हणाले विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी पोषक वातावरण प्रदान करणे हे आमचे ध्येय आहे...या नूतनीकरण केलेल्या शाळेमुळे विद्यार्थ्यांना त्यांचे उज्वल भविष्य घडवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावेल असा आम्हाला विश्वास वाटतो... असे मनोगत व्यक्त केले...
शाळेच्या शिक्षिका सौ.अर्चना शेळके-पाटील मनोगत व्यक्त करताना म्हणाल्या, पोस्को कंपनीला विनंती करण्यापूर्वी आम्ही अनेक सामाजिक संस्थाना संपर्क करायचा प्रयत्न केला होता पण कुठूनच काही मदतीचा हात पुढे आला नाही... मुलांच्या जीवाला धोका असणारी, मोडकळीला आलेली शाळा कशी सांभाळायची हे खूप मोठं आव्हान आमच्यासमोर उभे होते... “पण अखेरीस, दुर्गम भागात असलेल्या या शाळेत कोणी लक्ष घालेल का"? अस वाटत असताना पोस्को ने नुतनीकरणाचे काम हाती घेऊन ते यशस्वीरित्या पूर्ण केले... याबद्दल आम्ही कायम पोस्को चे ऋणी राहू...नवीन शाळेत नवीन दिवे, नवीन पंखा, सर्व नवीन गोष्टी कधी एकदा वापरायला मिळणार याची मुलांना खूप उत्सुकता होती..आणि ती आज त्यांच्या डोळ्यात स्पष्ट दिसत होती...
शिक्षणासाठी मुलभूत आणि भौतिक सुविधा असणे हे विद्यार्थी आणि शिक्षक दोघांसाठी तितकेच गरजेचे आहे...या नुतनीकरण केलेल्या शाळेच्या आवारात आल्यावर मुलांच्या, पालकांच्या आणि शिक्षकांच्या चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावत नव्हता... पोस्को महाराष्ट्र स्टीलची शिक्षणाप्रती असलेली बांधिलकी शालेय नूतनीकरणामुळे स्पष्ट दिसते... पोस्को महाराष्ट्र स्टील कंपनी सामाजिक बांधिलकी जपण्यात नेहमीच अग्रेसर राहिली आहे...
.jpg)