महाराष्ट्र वेदभुमी

७२ गावांची जबाबदारी नऊ पोलीसांकडे


सचिन चौरसिया प्रतिनिधी

आदिवासी भागातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

आधीच कर्मचाऱ्यांची ओरड असतांना सहा कर्मचारी प्रतिनियुक्तीव

रामटेक :- आदिवासी बहुल भागात नागपूर जबलपूर महामार्गावर देवलापार पोलीस स्टेशन अंतर्गत ७२ गावे येतात परंतू या विस्ताराने व लोकसंख्येन सुध्दा मोठे असलेल्या पोलीस ठाण्यात आधीच कर्मचाऱ्यांची ओरड असतांना येथुन वेतन घेणारे सहा कर्मचारी मात्र त्यांच्या सोईच्या ठिकाणी नोकरी करीत असल्याने येथील कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे...

        सदर पोलीस ठाणे हे मध्यप्रदेशच्या सिमेवर नागपूर जिल्ह्यातील शेवटचे ठाणे आहे... येथे ठाणेदाराव्यतीरिक्त ३६ कर्मचारी कार्यरत आहे... एक पोलीस उपनिरक्षक, सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक चार, हवालदार १०, शिपाई तेरा, सहा महिला कर्मचारी तर तीन चालक कार्यरत आहे...

        कामाचा भार लक्षात घेता, यातील दोन अधिकारी वगळता पहिल्या पाळीत स्टेशन डायरी, ठाणा हजेरी, दिवस ड्युटी, वायरलेस असे चार तर दुबार पाळीत याच ड्युटीत पुन्हा चार कर्मचारी यांनी एकदा कर्तव्य पार पाडले की सुटी. यात आठ कर्मचारी दररोज गुंतले असतात...

          याशिवाय ऑफीसमध्ये दररोज एक, क्राईम रायटर, अधिकारी रायटर, खुपिया, मोहरर, मदतगार, रामटेक न्यायालय, नागपूर न्यायालय असे आठ कर्मचारी यात लागून असतात यांनाही कार्यालयीन कामाव्यतीरिक्त काम करावे लागतात... यातील सहा कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणी व वरीष्ठांच्या साठगाठीने आपल्या सोईच्या ठिकाणी काम करीत आहे... याशिवाय दररोज तीन ते चार कर्मचाऱ्यांची साप्ताहिक असते...अशाप्रकारे अधिकारी घेवून २७ कर्मचारी व्यस्त असतात...

         यात शिल्लक राहिलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या केवळ नऊ आहेत..त्यामुळे ज्यांचेकडे बीट आहेत... त्यांनाही बीट मध्ये जाता येत नाही त्यामुळे ठाण्यातंर्गत येणाऱ्या लोकांवर पोलीसांचा वचक दिसुन येत नाही... एकेकाळी गावात पोलीस दिसल्यास दबदबा वाटायचा... परंतू आता तसे दिवस राहिले नसल्याने क्रॉईम वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे...

प्रतिनियुक्ती म्हणजेच सोईचे ठिकाण

सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दिलिप आगरकर हे उपविभागीय पोलीस अधिकारी, रामटेक सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक राजू राठोड हे पोलीस मुख्यालय,हवालदार  रंजीत जाधव व प्रमोद भोयर स्थानिक गुन्हे शाखा, शापाई केवल आडे हे नरखेड,महिला नायक जोत्सना बावनथडे रामटेक येथे कार्यरत आहे... विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांना कोणी पाहिले पण नाही... हे सर्व देवलापार वरुन वेतन घेत सोईच्या ठिकाणी कर्तव्य बजावत असल्याची माहिती आहे.प्रतिनियुक्ती (संलग्न) म्हणेच सोईचे ठिकाण मानल्या जाते...

Post a Comment

Previous Post Next Post