सोगाव - अब्दुल सोगावकर :
महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये प्रसिद्ध असणारे मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील
महाराष्ट्रातील ठिकठिकाणी होणाऱ्या बैलगाडा शर्यतीत नेहमीच अव्वल स्थान पटकावणाऱ्या मथुर बैल हा तमाम बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे...या मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील यांनी रविवार दि.२८ जुलै २०२४ रोजी रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील चोंढी येथील बैलगाडा शर्यत प्रेमी व सामाजिक कार्यकर्ते तसेच किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद उर्फ पिंट्या गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयाला सदिच्छा भेट दिली...
यावेळी सरपंच पिंट्या गायकवाड यांनी राहुलदादा पाटील यांचे मोठ्या उत्साहात भव्य स्वागत करत शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केले... या सदिच्छा भेटीदरम्यान राहुलदादा पाटील व पिंट्या गायकवाड यांच्यामध्ये बैलगाडा शर्यत विषयी बराच वेळ चर्चा रंगली होती...
राहुलदादा पाटील हे कल्याण शहराच्या जवळ असलेल्या आडिवरे गावातील रहिवाशी आहेत...ते एक संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत प्रेमी म्हणून ओळखले जातात.. त्यांच्याकडे असलेला मथुर नावाचा बैल हा महाराष्ट्रातील अनेक बैलगाडा शर्यतीत नेहमीच अव्वल स्थान पटकावत असल्याने बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये प्रसिद्ध आहे... यामुळेही राहुलदादा पाटील हे संपूर्ण महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत प्रेमी म्हणून ओळखले जातात... या सदिच्छा भेटीवेळी किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांच्या सोबत उपसरपंच मिलिंद पडवळ, डॉ. किरण शेटे, नदीम आत्तार, ओंकार आमले, पांडुरंग मुळीक, शुभम शिगम, साहिल शिगम, कृष्णा जेठे, न्हावी आप्पा, आत्माराम साळुंखे, व इतर मित्रपरिवार उपस्थित होते...
*फोटो लाईन :* महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यत प्रेमींमध्ये प्रसिद्ध असणारे मथुर बैलाचे मालक राहुलदादा पाटील हे चोंढी येथे किहीम सरपंच पिंट्या गायकवाड यांची सदिच्छा भेट घेताना,
