महाराष्ट्र वेदभुमी

शिक्षक शाळा व्यवस्थापनाच्या ऑर्डरला शेकापच्या नेत्यांकडून शिक्षण विभागावर दबाव!


शहानवाज मुकादम/रोहा

दि:१२ जुलै २०२४

रोहा: खैरेखुर्द येथील राजिप शाळा व्यवस्थापनाच्या शिक्षक ऑर्डरला शेकापच्या नेत्यांकडून शिक्षण विभागावर दबाव,

मा.आमदार महेंद्र दळवी यांच्या शिक्षक देण्याच्या आदेशाला गट शिक्षणाधिकारी रोहा यांच्याकडून (नकार) कारवाई होण्यास टाळाटळ. रोहा तालुक्यातील राजिप शाळांच्या पटसंख्या नुसार शिक्षक आहेत का ?

चौकशीअंत कारवाईची मांगणी...

चौकशीअंत शासन निर्णयानुसार कारवाईची पालकवर्गाकडुन ह मांगणी होत आहे.. 

 खैरेखुर्द शाळेतील पट संख्या ८८ असुन उर्दु शिक्षक संख्या दोन असल्याने गट शिक्षणाधिकारी रोहा यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांच्या पटसंख्येनुसार सुडकोली शाळेतील पट संख्या १२ असुन तेथे दोन शिक्षक कार्यरत असल्याने तेथील सह शिक्षकेस खैरेखुर्द शाळेत व्यवस्थापनासाठी ऑर्डर दि:१३ जुन रोजी काढण्यात आली होती...

 सदरची कारवाई शिक्षण विभागाकडून होत असतानाच शेकापक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून दबाव होत असल्याचे समोर आले आहे...

मा.आमदार महेंद्र दळवी यांच्या शिक्षक देण्याच्या आदेशाला गट शिक्षणाधिकारी रोहाचा नकार


तसेच आमदार महेंद्र शेठ दळवी यांनी ही सदरच्या शिक्षीकेस तात्काळ खैरेखुर्द शाळेत हजर करण्याच्या सुचना दिल्या होत्या...

परंतू गट शिक्षणाधिकारी रोहा यांच्याकडे विचारणा केली असता सुडकोली शाळेतील मुख्याध्यापिका कार्यमुक्त करण्यास तयार नसल्याचे सांगून आमदार दळवीच्या आदेशाला टाळाटाळ केल्याचे उघड होत आहे...

 सदर विषयात गट शिक्षणाधिकारी रोहा या दबावात काम करीत असल्याचे स्पष्ट दिसत आहे...

रोहा तालुक्यातील राजिप शाळांच्या पटसंख्यानुसार शिक्षक आहेत का ?

 राजिप उर्दु शाळा खैरेखुर्द येथे उर्दु माध्यमातून इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतचे वर्ग असतानाच गेले दोन वर्षापासून उर्दु शिक्षकाची संख्या मात्र दोनच आहे...

 शेकापक्षाचे स्थानिक नेते मंडळींकडून होत असलेल्या दबावात गट शिक्षणाधिकारी काम करीत असल्याने खैरेखुर्द शाळेला उर्दु शिक्षिकेच्या काढलेल्या ऑर्डरप्रमाणे हजर न केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे...

 रोहा तालुक्यातील राजिप शाळेतील विद्यार्थ्यांची पट संख्या आणि उपलब्ध शिक्षक यांची चौकशीअंत शासन निर्णयानुसार कारवाई करण्याची मांगणी होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post