महाराष्ट्र वेदभुमी

रोहा लायन्स क्लबचे सुवर्ण वर्षात पदार्पण अध्यक्षपदी भाऊसाहेब मानेनी स्वीकारले पदभार.



कोलाड (श्याम लोखंडे ) :

 गेली पन्नास वर्षांहून अधिक काळ समाज सेवेशी संघटीत असलेल्या लायन्स क्लब रोहाचे सुवर्ण वर्षात पदार्पण अध्यक्ष पदी लायन भाऊसाहेब माने यांची निवड झाली आहे... अध्यक्षा लायन सौ सुश्मिता शिट्याळकर  यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच धाटाव औद्यगिक क्षेत्रातील आर आय आय सी सभाग्रह येथे नुकताच संपन्न झालेल्या पदग्रहण सोहळ्यात सर्वानुमते भाऊसाहेब माने आणि त्यांच्या कार्यकारिणी तील सहका-यांना लायन्सक्लब ३२३१ ए ४ चे जिल्हा उपप्रांतपाल एम जे एफ लायन प्रविण सरनाईक यांनी पदाची शपथ दिली... यावेळी लायन्स च्या डिस्ट्रीकचे पदाधिकारी एम जे एफ लायन नयन कवळे, यांनी लायन्स क्लब रोहाचे नव्याने सभासदत्व घेतलेल्या सभासद लायन अविनाश जाधव, मनीषा संकपाल, सुबोध गांगुर्डे, अलका नांदगावकर, माया शहा, सिद्धेश खटावकर,यांना सभासदत्व बहाल करत शपथ देत तद्नंतर बोर्ड ऑफ डायरेक्टर, खजिनदार, सेक्रेटरी तसेच नवीन अध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली...

    तर नवे अध्यक्ष भाऊसाहेब माने यांनी आगामी काळ हा क्लबचा  स्वत्रंत महोत्सवी वर्ष आहे...या अनुषंगाने रोहा शहर आणि परिसरात आधिक अधिक विविध प्रकारचे उपक्रम तसेच वृक्ष लागवड आणि रोटरी क्लब ऑफ रोहा आणि लायन्स क्लब रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने सुंदर फुलांचे शहर आणि परिसरात विविध प्रकारचे फुल झाडे लावण्याचे हे उद्दिष्ट ठेवत सामाजिक. बांधिलकीचे जतन करत विविध उपक्रम राबविले जाणार असल्याचे सांगत नारी शक्तीने मागील वर्षात खूप मोठी मोलाची कामगिरी केली असल्याचा आनंद व्यक्त केला तसेच पन्नासावे वर्ष म्हणजे सुवर्ण रौप्य महोत्सव रोहा लायन्स क्लब साठी अधिक जोमाने काम केले पाहिजे असे आवाहन उपस्थित लायन मेंबर्स ना केले...


यावेळी नियुक्त करण्यात आलेली कार्यकारिणी पुढील प्रमाणे उपाध्यक्ष- लक्ष्मण शिट्यालकर आणि पराग फुकणे, सेक्रेटरी रसिदा रोहावाला, सहसेक्रेटरी- वर्षा सातपुते,खजिनदार जयदेव पवार,सह खजिनदार संपदा देशपांडे , बोर्ड ऑफ डायरेक्टर ला.नुरुद्दिन रोहावाला रविंद्र घरत,प्रदीप दामानी, प्रत्युत कुलकर्णी, हेमंत गांगल,तलवार, नितेश कटारिया,डॉ तुषार राजपूत, डॉ रुपेश, ईल्याहा डबीर, तोसिफ येरुनकर ,यांना डिस्ट्रिक्ट व्हॉईस गव्हर्नर एम जे एफ लायन प्रवीण सरनाईक यांनी पदाची शपथ ग्रहण दिली...


लायन सुश्मिता शिट्याळकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमाला यावेळी विचार मंचावर इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३१ ए ४  चे जिल्हा उपप्रांतपाल एम जे एफ लायन प्रवीण सरनाईक,एम जे एफ लायन नयन कवळे, झोन चेअरपर्सन विवेक सूभेकर, रिजन चेअरपर्सन लायन विजय वनगे,लायन रसिदा रोहावाला, लायन वर्षा सातपुते सह प्रमुख मान्यवर, कोलाड लायन्स क्लबचे पदाधिकारी, व आदी रोहा क्लब चे लायन सदस्य आणि रोटरी क्लब रोहा चे पदाधिकारी उपस्थित होते...अध्यक्षा सुश्मिता शिट्याळकर यांनी प्रास्ताविक करताना मागील वर्षातील कामाचा आढावा घेत सांगितले की नेत्र तपासणी शिबिर तसेच मोती बिंदू शस्त्रक्रिया या बरोबरच रोहा शहर तसेच ग्रामीण भागात सर्व सदस्य यांच्या वतीने सामाजिक तसेच विविध उपक्रम राबवत एकुण एकशे चौदा उपक्रम राबविण्यास.तर लायन महेश तावडे व लायन संपदा देशपांडे यांनी डिस्ट्रिक्ट व्हॉईस गव्हनर्र लायन प्रवीण सरनाईक आणि नयन कवळे यांची ओळख परीट करून दिली...तर लायन सरनाईक यांनी सांगितले की गेली अनेक वर्षापासून स्थापन करण्यात आलेला रोहा लायन्स क्लबशी माझे असलेले ऋणानुबंध नात हेच मनाचं मोठं पण असल्याचे सांगत हे क्लब प्रभावशाली शहरासह ग्रामीण भागात उत्तमरीत्या काम करत आहे तर वर्षभरात नारी शक्ती सबसे भारी अशी उंच भरारी या क्लब ने साऱ्या डिस्ट्रिक्ट मध्ये घेऊन गोल्डन पुरस्कारावर आपले नाव कोरले क्लब च पन्नासाव्या वर्षात पदार्पण केले आहे नव्याने रायगड डिस्ट्रिक्ट मध्ये या क्लबचा समावेश असल्याने आधीक जोमाने काम करण्याची संधी मिळाली असल्याचे व्हॉईस गव्हर्नर सरनाईक यांनी उपस्थित लायन सदस्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले तसेच पन्नास वर्ष पूर्ण केलेल्या या क्लबच्या तुमच्या कार्यक्रमाला येण्याचं भाग्य लाभलं आणि आलो याचा आनंद यावेळी व्यक्त केला...

     तसेच एम जे एफ लायन नयन कवळे यांनी देखील या क्लबने चांगले काम केले असल्याने अनेक पारितोषिके व पुरस्कार प्राप्त केले आहेत त्यामुळे या क्लबचे सामाजिक कार्यात मोठे योगदान असल्याचे सांगत त्यांच्या कार्याची प्रशंसना करत गेली वर्षभरात सुश्मिता शिट्याकर यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक पर्यावरण व विविध कामांचा उल्लेख या यावेळी आवर्जून करत या क्लबचे अभिनंदन केले...तर लायन रविंद्र घरत यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगीतले की मागील पन्नास वर्षापूर्वी लायन्स क्लबचे लावलेले रोपटे आज वटवृक्षात रूपांतर झाल्याचे दिसून येत आहे...तसेच रोहा लायन्स क्लबचे सुवर्ण वर्षात पदार्पण होत असल्याने जुन्या आठवणींना उजाळा देत अनेकांनी दिलेल्या योगदानाचे यावेळी त्यांचे कौतुक केले तर सुरू केलेल्या व्हिजन सेंटर तसेच ग्रामीण भागात केलेले शिबिर नेत्र तपासणीत पाच हजार रुग्णांची तपासणी आणि मोफत दोन हजार रुग्णांची शस्त्रक्रिया करण्यात आली... त्याच बरोबर शैक्षणीक साहित्य, गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान वृक्ष लागवड,रक्त दानात पंधराशेहुन अधिक दात्याने रक्त दान केल्याने गिनीज बुक ऑफ वर्ल्ड मध्ये नोंद झाली आहे तर पन्नास हून अधिक मेंबर क्लब मध्ये कार्यरत असलेल्याचे सांगितले...

तसेच तद्नंतर नव्याने पदभार स्वीकारल्यानंतर नवे अध्यक्ष लायन भाऊसाहेब माने तसेच नवीन पी एस टी व्हिपी यांचे उपस्थितांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. सदरचा कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन स्वागत गीत व प्रतिज्ञा करून करण्यात आली तर अभूतपर्व प्रतिसाद लाभलेल्या या सुंदर आणि देखण्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लायन सौ.शहा आणि महेश तावडे यांनी केले तर क्लबच्या नव्या सेक्रेटरी रासिदा रोहावाला यांनी आभार मानले तर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व लायन सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.तर कार्यक्रमाची सांगता क्लबचे सुवर्ण वर्षात पदार्पण झाल्याने केक कापून मोठा आनंदोउत्सव साजरा करत सस्नेह भोजनाची याची सांगता करण्यात आली...

Post a Comment

Previous Post Next Post