महाराष्ट्र वेदभुमी

वायु विद्युत बोकडविरा शाळेत गुरू पौर्णिमा कार्यक्रम संपन्न



उरण दि.२१/७/२०२४

    भारतीय मूल्यांची ,संस्कारांची आणि गुरू शिष्य परंपरांची जाणीव शाळकरी मुलांना व्हावी.. या हेतूने जनरल एज्युकेशन इन्स्टिट्यूटची वायु विद्युत  केंद्र बोकडविरा शाळेमध्ये गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला...  सदर कार्यक्रमास नवीन शेवे केंद्राचे केंद्रप्रमुख तथा उरण कोमसाप चे अध्यक्ष श्री. मच्छिंद्रनाथ म्हात्रे प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते...

    या वेळेस  गप्पा -गोष्टी ,कवितांच्या माध्यमातून मुलांशी सुसंवाद साधून गुरू पौर्णिमेचे महत्व  श्री.मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी मुलांना सांगितले.आदर्श गुरूत   देशाला प्रगतीकडे नेण्याची ताकद असते. भावी पिढी संस्कार मय घडवण्याची ताकद गुरूत असते आणि अशी आदर्शावत गुरू शिष्याची परंपरा आजही भारतात टिकून आहे म्हणून आपला देश प्रगती पथावर आहे .असे मत या वेळेस मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी व्यक्त केले.  या वेळी कार्यक्रमात सहभागी झालेल्या विद्यार्थाचे,त्यांनी सादर केलेल्या कला गुणांचे कौतुक करत शाळेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या...

    गुरू पौर्णिमे निमित्त शाळेतील अक्षरा दोरगे,प्रसन्न देवकाते,प्रियेशा पाटील आदी विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून गुरू विषयी आदर व्यक्त केला...

     कार्यक्रमाच्या सुरूवातीला शाळेच्या मुख्याध्यापकीका सौ. हेमा कवळसे मॅडम यांनी सरस्वतीच्या प्रतिमेचे आणि संस्थेचे आद्य संस्थापक गुरुवर्य स्वर्गीय गोपाळ नारायण अक्षीकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. संगीत शिक्षिका श्रीमती पल्लवी पंडित मॅडम यांनी स्वरबद्ध केलेले महती सांगणारे  गीतशाळेतील गीतमंचाने सादर केले...

   शाळेतील शिक्षिका श्रीमती आरती म्हात्रे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला तर श्रीमती कजबजे मॅडम  यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले...

Post a Comment

Previous Post Next Post