शहानवाज मुकादम/रोहा
मुरुड: तालुका अंतर्गत 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण' योजनेच्या शिबिराचं आयोजन महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास मंत्री ना.आदिती वरदा सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनात करण्यात आलं...
या शिबिरात लाभार्थ्यांच्या लाडकी बहीण योजनेचे ऑनलाइन व ऑफलाइन फॉर्म भरून घेण्यात आले...
तसेच यावेळी जिल्हा परिषद आणि महिला व बालविकास विभागामार्फत बचत गटांना मंजूर झालेल्या दळण मशीन, सतरंजी व इतर विविध वस्तूंचे आणि नवजात शिशुंना बेबी केअर कीटचे वाटप ना. आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले...
