महाराष्ट्र वेदभुमी

केळवणे येथील तरुणाचा मृत्यू नेमका कशामुळे ? घातपात की अपघात?


केळवणे पनवेल/२२ जुलै/अजय शिवकर

केळवणे येथील ४० वर्षीय तरुण राजेश हरिदास ठाकूर याचा गुड रित्या झालेला मृत्यू जनमानसात पडलेलं एक कोड आहे... तीन दिवस होऊनही अजूनही पोलीस मृत्यूचा तपास का लावू शकले नाहीत... याच विषयावर तर्क-वितर्कांच्या चर्चेला उधाण आले आहे...

जे एन पी ए पोर्ट परिसरात कॅन्टीनच्या व्यवसायात काम करणारा राजेश ठाकूर शनिवारी २० जुलैला संध्याकाळी कामावरून घरी परतत होता,उशीर झाल्यामुळे पत्नीने फोन केल्यावर मी कोप्रोली येथे सामान खरेदी करत आहे असे त्यांनी सांगितले त्यावेळी रात्रीचे नऊ वाजले होते...

परंतु बराच वेळ होऊनही  राजेश घरी आला नाही म्हणून त्याच्या पत्नीने नातेवाईकांना ही गोष्ट सांगितली, नातेवाईकांनी शोध घेत असताना राजेश सारडे पिरकोन रस्त्याच्या कडेला मृत अवस्थेत सामना-सह पडलेला सापडला...ही गोष्ट तात्काळ उरण पोलिसांना कळवतात उरण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन  पंचनामा करून राजेशला इंदिरा गांधी हॉस्पिटल उरण येथे दाखल केले असता तो मृत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले...घटनेला तीन दिवस होऊनही अजूनपर्यंत पोलिसांना कोणताच धागा सापडला नसल्यामुळे नागरिकांमध्ये सर्वत्र  वेगवेगळ्या चर्चा केल्या जात आहेत...राजेशच्या अकस्मात मृत्यूमुळे सर्वत्र हलहल वक्त होत आहे...त्याच्यामागे त्याची पत्नी आणि तीन छोट्या मुली आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post