मयूर पालवणकर : मुरुड रायगड
गुरू पौर्णिमेचा औचित्य साधून महिला पुरुष कलगी तुरा मंडळांनी सभेचं आयोजन केलं होत... त्यामध्ये रायगड आणि रत्नागिरीचे नामवंत शाहीर उपस्थित होते... आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद शाहीर.श्री वसंत भोईर यांनी भूषविले...सभेमध्ये विविध विषयावर चर्चा करण्यात आली असून त्यातील एक शक्ती तुरा ह्या कार्यक्रमात कुठे तरी महिलांना रोखण्यासाठी एक गट प्रचंड विरोध करत असून त्याच्या विरोध न जुमानता कार्यक्रम सुरू ठेवणार असे खडे बोल देऊन विरोधकांना खडसावले आहे आणि ह्या पुढे जर असाच विरोध राहिला तर महिला आयोगाची सुध्दा मद्दत घेतली जाईल असे कलारंग मंच आणि जेष्ठ शाहीर संदीप काणसे सर यांनी सांगितले...
तसेच मंडळाचे अध्यक्ष शाहीर गणेश शिंदे ,उपाध्यक्ष शाहीर सौ.तेजल पवार गोताड, सचिव शाहीर भिकाजी जाधव , शाहीर रत्नाकर महाकाळ तसेच आदी मान्यवर उपस्थित होते...
