कोलाड (श्याम लोखंडे)
जीव गेल्यावर उपाय योजना केल्या जातील का?चिखलातून करावा लागतो मार्गक्रमण.
मुंबई गोवा महामार्गावर कोलाड नाक्यावरील मेन चौकात तसेच बाजार पेठेतील मार्गावर सर्व्हिस रोडवर मोठ मोठे खड्डे पडल्याने प्रवास धोक्याचा झाला आहे तर सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि त्यात पडलेले खड्डे चिखलमय पाणी त्यातूनच मोठ मोठी जड अवजड वाहने करतात मार्गक्रमण त्यामुळे बाजार सामान खरेदी साठी आलेल्या नागरिकांवर तसेच पादचारी यांच्यावर या चिखलमय पाण्याचा जलाभिषेक होत असल्याने एकच संताप व्यक्त केला जात आहे...
कोलाड आंबेवाडी नाक्यावरील दोन्ही बाजूकडील म्हणजे इंदापूर कडून मुंबईकडे जाणारा तसेच मुंबईकडून इंदापूर गोवा कडे जाणारा सर्व्हिस रोड रस्त्याची खुपच दुरावस्था झाली आहे. मोठ मोठे खड्डे पडले असुन चिखलयुक्त पाणी रस्त्यावर साचत असल्याने वाहतुकीस रस्ता अडचणीचा ठरत आहे. तर येथील सर्व्हिस रोड राहिला नाही धडात की वासरात त्यामुळे याला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.तर एकीकडे महामार्गावर भर चौकात उड्डाण फुलाचे काम सुरू केला गेला आहे त्यात वहातूक ही सुरू त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना त्रासदायक आणि धोकादायक ठरत असल्याने प्रवाशी जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मात्र संबधित यंत्रणेनेला याचे सोयरसुतक नसल्याचे बोलले जात आहे. महामार्गाचे चौपदरी करणाचे काम गेली सोहळा वर्षाहून अधिक काळ सुरू आहे. मात्र नागोठणे इंदापूर दरम्यातील या मार्गाचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे होत असल्याने येथील स्थानिकांनी अनेकदा याबाबत तक्रारी केल्या माञ त्याला सदैव केराची टोपली दाखवली जात आहे तर सदरच्या ठेकेदार याला अभय दिले जाते का असा प्रश्न निर्माण होत आहे...
कोलाड च्या चौकात ऐन पावसाच्या तोंडावर उड्डाणपूल बांधण्याचा घाट संबधीत ठेकेदार तसेच सदरच्या खात्याकडून करण्यात आले माञ हे काम सूरू करण्याआधी दोन्हीं बाजूचे सर्व्हीस रस्ते व त्यांचे काम चांगले करण्याची गरज होती रस्त्या मार्गालगत बांधण्यात आलेले आर सी सी गटात तेही निकृष्ट दर्जाचे असल्याने त्यावरील टाकले गेलेले झाकण तुटले आहेत त्यामुळे काही ठिकाणीं ते पादचारी नागरीक तसेच प्रवासी वर्गाला धोकादायक ठरत आहेत त्याच बरोबर रोहा मार्गाकडे असलेल्या कै.द.ग.तटकरे चौकातील भर रस्त्यात एक भला मोठा भगडाड पडून त्यास महिना दोन महिने उलटुन गेले मात्र याकडे देखिल कानाडोळा करुन केवल प्रवासी वर्गाच्या जीवाशी खेळ मांडला असल्याचे दिसून येत आहे.तर कामाला सुरूवात झाल्यापासून एक दोन वर्षात पुर्ण होईल असे सांगितले जाते मात्र काम पुर्ण कधी होणार? याची तालुक्यातील जनतेला वाट पहाणे भाग पडत. रस्त्यावर चालणेही मुश्किल झाले आहे. तसेच पावसाळा सूरू होताच खड्यांची बोंब सूरू तद्नंतर संबधीत तहसीलदार, प्रांताधिकारी,जिल्हाधिकारी ,आमदार,खासदार, मंत्र्यांचा पाहणी दौरा सुरू होतो मात्र त्यातुन ठेकेदार कोणता बोध घेतो हे मात्र गुलदस्त्यात त्यामुळे या साऱ्या प्रकारात सर्व सामान्य जनतेला बली देण्याचे काम या सरकारकडून केले जात असल्याचे बोलले जात आहे...
प्रतिक्रिया
येथे रस्त्याचे काम करत असलेले कल्याण टोल कंपनी व त्यांचे व्यवस्थापन हे केवळ येथील नागरीक तसेच प्रवाशी वर्गाच्या जीवावर उठले असल्याचे दिसून येत आहे मागील पंधरा वीस दिवसांपूर्वी येथील स्थानीक नागरिकांनी रस्ता आंदोलने केली होती माञ दोन दिवसात हे काम करुन देतो असे त्यांच्या व्यवस्थापन अधिकाऱ्यांनी येथील संबधीत पोलिस निरिक्षक नितिन मोहिते यांच्या समवेत सांगितले होते मात्र त्यावर कोणतीच कारवाई केली नाही तसेच त्यात आधीक या पुई ते तीसे मार्गाची गंभिर परिस्थिती झाली आहे दुचाकी स्वार खड्यातून घसरून पडत आहेत आमदार,खासदार, दररोज पाहणी करतात मात्र त्यात कोणतीच सुधारणा अथवा उपाय योजना ठेकेदार यांच्याकडून केली जात नाही उलट बोल बचन सरकारचा गैर फायदा ठेकेदार घेत असून जनतेच्या जीवाचा खेळ मांडला आहे .भयानक पडलेले खड्डे आणि वाढते आपघात तसेच वाहतूक कोंडी त्यामुळे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची अक्षरशः धावाधाव होत आहे तसेच पाणी साचून राहिल्याने त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे यावर लवकरात लवकर उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी नाही तर लवकरच स्थानीक नागरीक रस्त्यावर बसून आंदोलन छेडणार असल्याचे चंद्रकांत लोखंडे सामाजिक कार्यकर्ते आंबेवाडी यांनी सांगितले...
