महाराष्ट्र वेदभुमी

किट्समध्ये व्ही. राजेश्वरराव यांना आदरांजली

 


सचिन चौरसिया प्रतिनिधी

रामटेक :  दिवंगत किट्स संस्था अध्यक्ष  व्ही.  राजेश्वरराव यांच्या १३ व्या पुण्यतिथीनिमित्त कवी कुलगुरू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स रामटेक (किट्स) येथे अभिवादनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले... याप्रसंगी त्यांच्या पुतळ्यास प्राचार्य डॉ. अविनाश श्रीखंडे यांच्या हस्ते मालार्पण करून आदरांजली अर्पण करण्यात आली... 

  यावेळी प्रोजेक्ट ऑफिसर आर. श्रीनिवास, कुलसचिव पराग पोकळे यांच्यासह विविध विभागांचे अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते... व्ही.  राजेश्वरराव यांचे रामटेक परिसरातील विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देण्याकरिता मोठे योगदान आहे. १९८५ मध्ये किट्सची स्थापना केली... या संस्थेत सध्या हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत..


Post a Comment

Previous Post Next Post