महाराष्ट्र वेदभुमी

हॉस्पिटल गाठल्यामुळे मोठा अनर्थ टळला



सचिन चौरसिया प्रतिनिधी

महीलेचे प्राण वाचले

रामटेक :- तालुक्यातील भोजापुर गावातील रहिवासी रंजना नामदेव वडाद्रे  दि. २४ जुलै  ला शेतामध्ये धान रोवणीसाठी गेला होत्या.. धान(परा) काढताना उजव्या हाताचा बोटाला एका सापाने चावा घेतला व त्वरित तिथल्या बाकीचा लोकांना साप चावल्याचे सांगितलं त्वरित शेतात काम करत असलेल्या दोन लोकांनी त्या महिलेला रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आले...डॉक्टरांना साप चावल्याची माहिती दिली असता डॉक्टरांनी उपचार सुरू केले... शेतातल्या एका व्यक्तीने वाईल्ड चॅलेंजर ऑर्गनायझेशन सर्पमित्र राहुल कोठेकर व अजय मेहरकुळे यांना सर्प दंशची माहिती दिली... माहिती मिळताच सर्प मित्र हे रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये धाव घेत सर्प दंश झालेल्या महिलेंचा बोटाची पाहणी करून सर्प दंश झाल्याचे लक्षणे लक्षात घेत जाहाल विषारी रसेल वायपरचे लक्षणे दिसून आले... तिथे डॉक्टर यांना जाहाल विषारी रसेल वायपर असल्याचे सांगुन उपचार करून नंतर पुढील उपचारासाठी नागपूर मेडिकलला रेफर करण्यात आले... मेडिकल मध्ये सदैव तत्पर सेवा देणारे नेहमीच मदतीसाठी धावून जाणारे नितेश भांडारकर व त्यांची टीम मेडिकल हॉस्पिटलला मदतीला धावुन गेले... व मेडिकलला ऍडमिट करून व पुढील उपचार सुरू आहे..

 योग्य उपाय

तरी ग्रामीण भागातल्या शेतकरी शेत मजूर लोकांना वाईल्ड चॅलेंजर सर्प मित्रान कडून एक नम्र विनंती आहे की शेतामध्ये काम करत असताना काळजीपूर्वक लक्ष घेऊन दक्षतेने काम करा...जेणेकरून कोणत्याही सर्प दंश असो किंवा इतर कोणतेही घटना घडणार नाही व महत्वाचे म्हणजे सर्प दंश झाल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयामध्येच जा.. मदतीला कोणत्याही जवळील सर्पमित्रांना कळवावे.. जेणेकरून सर्प दंश झालेला व्यक्तीला सर्प मित्रानंकडून मदत मिळेल...

रामटेक सर्पमित्र नंबर राहुल कोठेकर 9527712101 अजय मेहरकुळे 9028427076 ,

Post a Comment

Previous Post Next Post