शेगाव/ २४ जुलै:प्रतिनिधी चंद्रशेखर केंगार
गोपाळकाला व गुरुपूजनाने आषाढी यात्रेची सांगता
भंडी शेगावातील आई प्रतिष्ठानच्यावतीने भाविकांना अन्नदान विनेकरांचा सत्कार
भंडी शेगाव तालुका पंढरपूर येथील आई प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष धीरज दिलीपराव देशमुख व प्रतिष्ठानच्या संचालकांच्या वतीने यंदाच्या आषाढी वारीत पंढरपुरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी अन्नदान आरोग्य सेवेसह 200 किलो फुलांची उधळण करत अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करत पंढरपुरात नवा उपक्रम नोंदवणाऱ्या या प्रतिष्ठानच्या स्तुत्य उपक्रमाबाबत सर्वत्र समाधान व्यक्त करण्यात येत आहे...
मराठवाडा ही संतांची भूमी आहे ही मूळ संकल्पना उरी बाळगून सर्वदानात अन्नदान हे श्रेष्ठदान आहे हे मूळ तत्व स्वीकारून भंडी शेगाव येथील आई प्रतिष्ठानच्या वतीने प्रतिवर्षी मातृत्वाच्या भावने तुन मराठवाड्यासह सबंध राज्यातून पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांना अन्नदान करण्याचे महान कार्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात येत असते..
यावर्षी 50 हजारापेक्षा जास्त वारकऱ्यांना अन्नदान करण्यात आले असून आरोग्य शिबीर आयोजन करण्यात आले होते याप्रसंगी 200 किलो फुलांचा वर्षाव करत एक हजार विनेकऱ्यांचा सत्कार ही करण्यात आला.. या स्तुत्य उपक्रमाचे मराठवाड्यातून स्वागत करण्यात येत आहे..
यावर्षी वारकऱ्यांच्या स्वागत समारंभास सर्वश्री मुख्यमंत्र्यांचे स्वयं सहाय्यक शशिकांत जाधव संत तुकाराम महाराज पालखीचे अध्यक्ष नितीन मोरे,डोंबिवलीचे समाजसेवक महेशजी पाटील, अभिनेत्री दिपाली भोसले,डॉ सुनिता पाटील, समाजसेवक विजय बाकडे,एडवोकेट गणेश इनामदार,प्रतापराव पाटील,विनोद मढवी,संतोष साळुंखे,डॉ संतोष बजाज, डॉ अरुण गावडे,राजाभाऊ माने,शशिकांत पाटील,प्रसाद मळगे, विनोद पाटील ,अभिजीत माने,बालाजी माने, अमोल कोडक,विश्वजीत माने, अभिजीत भोसले, दिनेश कवडे, शाहरुख शेख,डॉ पद्मसिह माने,रामलिंग दरेकर,डॉ निखिल भोसले,शरद दरेकर,केलीम शेख,प्रशांत पाटील, नंदू माने आदी मान्यवर हजर होते..
