सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक : रामटेक पोलीस ठाण्यांतर्गत कवडक (दुधाळा) येथील गजानन गोविंदा बालगोटे (वय ७२) यांच्या पिशवीतिल दोन अज्ञात महिला चोरट्यांनी ब्लेडने वार करून २० हजार रुपये चोरल्याची घटना २४ जुलै रोजी दुपारी १.३० वाजता युनियन बँकेजवळ घडली...
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकरी गजानन बालगोटे यांनी मजुरांची मजुरी देण्यासाठी स्टेट बँकेतून २० हजार रुपये काढून पिशवीत ठेवले ..आणि आधारकार्डची झेरॉक्स काढण्यासाठी झेरॉक्स दुकानात गेले...झेरॉक्स काढत असताना त्याच्याजवळ दोन महिला उभ्या होत्या...पिशवीला ब्लेडने चिरा मारूंन वीस हजार रुपये काढून घेतल्यानंतर महिला पसार झाल्या...चोरी झाल्याचे लक्षात आल्यानंतर गजानन बालगोटे यांनी रामटेक पोलिसात तक्रार दिली... भरदिवसा चोरी झाल्याने रामटेकमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे... पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत...
