सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- तालुका अंतर्गत जिल्हा परिषद शाळा रमजान घोटी व पुसदा क्रमांक १ येथील शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षण साहीत्य वाटप करण्यात आले...
शिक्षण हे प्रत्येक विद्यार्थ्यांचा मूलभूत अधिकार असून गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्य पुरवून त्यांना शिक्षणाकरिता प्रोत्साहित करणे, तसेच शिक्षणाच्या प्रसारासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करणे हे अत्यंत गरजेचे आहे. ही गोष्ट लक्षात घेऊन मा.श्री.राजेंद्रजी मुळक यांच्या सामाजिक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शिक्षण उपयोगी शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी श्री.रामकृष्ण वरखडे (सदस्य पं.स.रामटेक), श्री महेश मडावी (माजी सदस्य पं.स.रामटेक), श्री अरुण वाडीवे (मुख्याध्यापक सेवानिवृत्ती), श्री पंचम कावाचे, श्री गोपाल मरसकोल्हे (अध्यक्ष शाळा समिती), श्री सुखराम इनवाते (अध्यक्ष शाळा समिती), सौ वैशालीताई मरकाम (सदस्य ग्रा.पं. सालई), सौ सारिकाताई कोकोडे (सदस्य ग्रा.पं. पुसदा क्र.१), श्री. आशितोष मगरे (मुख्याध्यापक), श्री. सचिन पाटील (मुख्याध्यापक), सौ अंजलीताई पातोळे (शिक्षिका), श्री. ईश्वर वरखडे इत्यादी मंडळी उपस्थित होते...
