अलिबाग/२७ जुलै /अजय शिवकर
आपली साहित्य रचना समाजापर्यंत पोहचवण्यासाठी रायगड जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील गट शिक्षणाधिकारी यांचेकडे लेखक श्री.नरेंद्र पाटील यांनी आपले स्वलिखित पुस्तक संच सुपुर्द करून कौस्तुकास्पद उपक्रमाचे आयोजन केले...
दिनांक २२ आणि २३जून २०२४. या दोन दिवसांत प्रत्यक्ष जिल्ह्यांतील प्रत्येक पं.स. कार्यालयात जाऊन मा. गटशिक्षण अधिकारी साहेबांकडे प्राथमिक शाळांसाठी विनामूल्य स्वरूपात स्वलिखीत प्रकाशित पुस्तके सोपावली..
१) देव गेला दिगंतरा (नाटक)
२) आगरी कोळी संस्कृती (कादंबरी)
३) एकांकिकासंग्रह- मराठी
मुलखाची मर्दानी ,माझं प्राक्तन, जल्माची सोबतीण.
पं.स. का.शिक्षण विभाग उरण - १२०
पं. स. का. शिक्षण विभाग पनवेल- २४०
पं. स. का. शिक्षण विभाग खालापूर-१२०
पं. स. का. शिक्षण विभाग कर्जत -१२०
पं. स. का. शिक्षण विभाग पेण - २४०
पं. स. का. शिक्षण विभागअलिबाग-२४०
पं. स.का. शिक्षण विभाग मुरूड -१२०
पं. स. का. शिक्षण विभाग पोलादपूर- १२०
पं.स. का. शिक्षण विभाग महाड - १२०
पं. स. का. शिक्षण विभाग माणगाव- १२०
पं. स. का. शिक्षण विभाग श्रीवर्धन-१२०
पं. स.का. शिक्षण विभाग म्हसळे - १२०
पं. स. का. शिक्षण विभाग रोहा - १२०
पं. स. का शिक्षण विभाग तळा - १२०
पं. स. का. शिक्षण विभाग सुधागड -१२०
अशा एकूण २१६० पुस्तकांचे वाटप करण्यात आले...
या अगोदर श्री . नरेंद्र पाटील सर यांच्या पुस्तकांचे प्रकाशन उरण कोमसापच्या १०० व्या कविसंमेलनात केले होते...अशा प्रकारच्या उपक्रमाद्वारे श्री नरेंद्र पाटील साहित्यिक सेवा करत आहेत, आम्हाला अशा उपक्रमाचा नक्कीच आदर आहे...तुमच्या सेवेला सलाम असे कोमसाप शाखा उरण अध्यक्ष मच्छिंद्र म्हात्रे म्हणाले..