महाराष्ट्र वेदभुमी

मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक वस्तूंचे वाटप



कोप्रोली -उरण /२७ जुलै/अजय शिवकर

मा. मुख्यमंत्री मा. श्री. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी दि. २७ जुलै २०२४ रोजी शिवसेना शाखा प्रमुख मा. रविंद्र म्हात्रे तसेच माजी सभापती मा. विश्वास म्हात्रे साहेब याच्या प्रयत्नातून आणि इच्छेतून शिवसेना शाखा कोप्रोली यांचे मार्फत प्रथमिक शाळा कोप्रोली येथील विध्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला सदर कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांना शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले सदरवेळी उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सदर कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उरण तालुका प्रमुख मा. संतोष ठाकूर साहेब, उरण तालुका उपसंघटक श्री. रुपेश पाटील, कोप्रोली शाखा प्रमुख श्री. रविंद्र म्हात्रे, माजी सभापती सौ. स्वाती म्हात्रे, माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पाटील, माजी शाखा प्रमुख प्रल्हाद म्हात्रे, माजी उपसरपंच विपुल म्हात्रे, नवनिर्वाचित युवासेना प्रमुख निखिल म्हात्रे, नवनिर्वाचित शिवसेना कोप्रोली शाखा संघटक नंदराज म्हात्रे, सौ. सोनाली म्हात्रे, शिवसेना जेष्ठ कार्यकर्ते  भानुदास पाटील, परशुराम पाटील,नंदन म्हात्रे, महेश कोळी, धनेश म्हात्रे, गणेश कोळी, संतोष म्हात्रे,नितेश कोळी, धनंजय म्हात्रे, प्रवीण पाटील,चंद्रशेखर कोळी,मनोहर कातकरी, अर्जुन कोळी, मुकेश म्हात्रे हे उपस्थित होते...


   तसेच सदर शाळेचे मुख्यध्यापक, शिक्षक आणि विध्यार्थी वर्ग व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post