शहानवाज मुकादम/रोहा
रोहा: आज दि:०७ जुलै २४, रोजी तालुक्यात प्रवाह शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे पहिले कार्यालय प्रवाह नर्सिंग ॲन्ड पॅरामेडिकल रोहा या कार्यालयाचे उद्घाटन अमदार महेंद्र शेठ दळवी यांचे हस्ते संपन्न झाला...
तसेच उपस्थित मान्यवरांकडून आशोक सानप व त्यांचा मुलगा चेतन आशोक सानप यांना सर्वानीच शुभेच्छा दिल्या..
या उद्घाटन कार्यक्रमात उपस्थितांचे स्वागत श्री आशोक सानप यांनी केले...या सोहळ्यात शिवसेना शिंदेगटाचे तालुका प्रमुख अॅड मनोजकुमार शिंदे, मंगेश रावकर रोहा शहर प्रमुख, पंचायत समिती रोहा चे माजी उप सभापती श्री रामचंद्र सकपाळ, अनेक पक्षाचे पदाधिकारी, सानप परिवार उपस्थित होते.
कार्यक्रमाचा शेवट श्री चेतन आशोक सानप यानी उपस्थितांचे आभार मानून संपन्न केले.
