रायगड :- (नरेश पाटील)
मुंबई गोवा महामार्गावरील बाधित शेतकरी यांच्या समस्या सोडवण्याकरीता
मुंबई गोवा महामार्ग चे नुसतेच काम रखडलेले नाही तर ज्यांच्या जमिनी रस्ता रुंदी कारणासाठी वापरण्यात आल्या त्यांना दिलेल्या मोबदल्यातील तफावत अजूनही दूर न होता तीही १७ वर्षे रखडलेली आहे...या सर्व गोष्टींची खंत मनात बाळगून बळीराजा शेतकरी संघटनेचे नेते श्री जनार्दन नाईक उर्फ डॉन यांनी आक्रमक पाऊल उचलले... त्यांनी थेट मंत्रालयाच्या समोरच आत्मदहन करण्याची धमकी दिली आणि पोलिस यंत्रणा सतर्क झाली... दुसऱ्या बाजूने शासन,प्रशासन, लोकप्रतिनिधी यांच्याशी सतत संपर्क साधून सौहार्दाचे नाते जपणारे मुबईच्या लालबागमधील सामाजिक कार्याने सुपरिचित असलेले सामाजिक कार्यातील डॉन श्री.काका कदम हे हा आत्मदहनाचा प्रकार टाळण्यासाठी धावपळ करीत होते... सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री.रविंद्र चव्हाण यांनी विधान सभा निवडणूक आचार संहिता लागण्यापूर्वी त्यांच्या शासकीय निवास स्थानी शेतकऱ्यांची बैठक घेतली होती...
बैठकीच्या वेळी मंत्री महोदयांनी आचारसंहितेच्या कालावधीत शेतकऱ्यांची सुधारित देणी देण्यासाठी अंदाजित किती रक्कम लागेल याची माहिती संकलित करण्याची जबाबदारी श्री काका कदम आणि जनार्दन नाईक यांच्याकडे सोपविली होती जेणे करून निवडणूक निकालानंतर अर्थसंकल्प तरतूद करणे शक्य होऊन शेतकऱ्यांना न्याय देणे शक्य होईल.. त्या नुसार काम करीत असताना अचानक कोकण आयुक्त श्री.कल्याणकर साहेब यांची एस आर. ए विभागात बदली झाली... तर इतर अधिकाऱ्यांना निवडणूक ड्युटी लागली...त्यामुळे काम होत नव्हते... तसेच निवडणुकी नंतरही कोणी दाखल घेत नाही हे सहन न झाल्याने डॉन श्री.नाईक यांनी आत्मदहनाचा इशारा पत्र दिला अन् जय्यत तयारी सुरू असल्याची पोलिसांच्या गुप्तचर खात्याने माहिती देताच वडखळ पोलीस ठाण्याचे राष्ट्रपती पदक प्राप्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. प्रसाद पांढरे साहेब यांनी याची गंभीर दखल घेत डॉन श्री.जनार्दन नाईक याना चर्चेची विनंती केली...त्या विनंती नुसार झालेल्या चर्चेतून असे निदर्शनास आले की शेतकरी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण चे अधिकारी आणि प्रांत कार्यालय,भूमी अभिलेख अधिकारी यांच्यात संपर्काचा अभाव आहे... हे लक्षात आल्या बरोबर व पो.नी. पांढरे यांनी प्रांत अधिकारी श्री. प्रवीण पवार याना संपर्क करून संयुक्त बैठक तातडीने लावण्याचे सुचविले ती मान्य झाली तर श्री नाईक हे आत्मदहन थांबवतील आणि कायदा सुव्यवस्था राखण्यास सहकार्य करतील असे निदर्शनास आणून त्यांचे वरिष्ठ उप विभागीय पोलिस अधीक्षक श्री फडतरे साहेब यांच्याही निदर्शनास आणले... त्यामुळे प्रांत अधिकारी यांनी तात्काळ बैठक २६ जुलै,२०२४ रोजी आयोजित केली... या बाठकीला श्री. प्रवीण पवार तहसीलदार, फडतरे साहेब, पांढरे साहेब, NHAI सहायक अधिकारी सत्यान सेठ, विक्रांत कोरडे हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या वतीने उपस्थित होते...तर NHAI डायरेक्टर श्री यशवंत घोटकर हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे दिल्लीतून उपस्थित होते...प्रांताधिकारी यांच्या अनुमतीने श्री.काका कदम यांनी बैठकीस सुरुवात केली, पांढरे साहेब यांनी बैठकीचे प्रयोजन सांगून महत्वाच्या सूचना केल्या... त्या नंतर बैठकीची मुद्दे निहाय सुरुवात होऊन चर्चा झाली... चर्चेत सर्व खात्याच्या अधिकाऱ्यांनी सहभाग घेतला..चर्चेअंती आज पासून पुढील शुक्रवार पर्यंत NHAI च्या अधिकारी आणि भूमिअभिलेख खत्याने मंजूर ६० मिटर निकषानुसार जिथे वाद आहेत त्या जागी स्थानिक पोलीस अधिकारी, आणि प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत पूनर्मोजणी करून त्याची रीतसर नोंद करावी... त्याचा अहवाल वरिष्ठांच्या मंजुरी करीता त्वरित पाठवावा... आणि त्या अहवालावर प्रांत यांनी पुढील कार्यवाही करावी.. असे ठरल्यामुळे शेतकऱ्यांचे समाधान झाले...
तसेच अतिरिक्त जमीन संपादित कशी झाली ती कशी चुकीची आहे हे डॉन जनार्दन नाईक यांनी पटवून दिले... यावर चर्चा झाली कसा निर्णय घ्यायचा हे ठरले त्याला शेतकऱ्यांनी होकार दिला... अत्यंत अभ्यासपूर्ण चर्चा होऊन शेवटी उपस्थितांचे आभार मानून प्रांत अधिकारी श्री प्रवीण पवार आणि व पो.नी. श्री. पांढरे साहेब यांनी बैठक संपल्याचे जाहीर केले...
एकंदरीत संपूर्ण चर्चेचा आढावा घेतला असता अशी तीन महत्त्वाच्या खात्याच्या अधिकारी यांच्या उपस्थितीत सविस्तर चर्चा झाल्यामुळे शेतकऱ्यांना लवकरच न्याय मिळेल असा आशावाद शेतकरी बांधवांनी व्यक्त केला... श्री काका कदम आणि जनार्दन नाईक यांनी वृत्त वाहिणीशी बोलताना सांगितले की मंत्री श्री रवींद्र चव्हाण हे हा अहवाल प्राप्त होताच लागणार अतिरिक्त निधी तरतुदी करीता सहाय्य करतील...
दरम्यानचा काळात आज पर्यंत मंत्री हे कोकणातील असल्यामुळे आणि कोकण बद्दल आणि बाधीत शेतकरी बांधवांबद्दल आदर असल्यामुळे मंत्री महोदय यांनी वेळोवेळी त्यांच्या दालनात सन्मानाने बोलवून मार्गदर्शन केलेले आहे...त्यामुळे नक्कीच आम्हाला न्या मिळेल असा आशावाद व्यक्त केला...काही ठिकाणी आक्रमक तर काही ठिकाणी लवचिक धोरण अवलंबून अधिकारी वर्ग यांची माने जिंकण्यात श्री जनार्दन नाईक आणि काका कदम निश्चितच यशस्वी झाले असे स्वतः शेतकरी समूहात चर्चा करताना बोलत होते...