महाराष्ट्र वेदभुमी

अतिवृष्टीमुळे किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद


सिकंदर आंबेणकर प्रतिनिधी

दि.०८/०७/२०२४

 दोन दिवसापासून मुसळधार पावसाने रायगड करांना झोडपून काढले आहे.दि.०७ जुलै रोजी किल्ले रायगडावर ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला त्यामुळे किल्ले रायगड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे..

रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरेकटिंग करून बंद करण्यात आला आहे. पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे, तसेच सध्या परिस्थितीत किल्ले रायगडावर असलेले पर्यटकांना रोपवे ने गड उतार करण्यात येत आहे..

तसेच प्रशासनाकडून रोपे ने किल्ल्यावर जाण्यास बंदी करण्यात आली आहे...

Post a Comment

Previous Post Next Post