महाराष्ट्र वेदभुमी

रोहा अंकित फिओना सोसायटीत वृक्षारोपण


रोहा : वार्ताहर

रोहा तालुक्यातील भुवनेश्वर मधील अंकित फिओना सोसायटीत वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी बहावा, गुलमोहर, सोनमोहर, बकुळ, सप्तपर्णी व निंब आदी झाडांची लागवड करून ही झाडे सोसायटी सदस्यांनी जगवने व या झाडांचे संगोपण करण्याचा निर्धार करण्यात आला. यावेळी सोसायटी अध्यक्ष विजय गोतमारे, सचिव रविंद्र कान्हेकर, खजिनदार अमित खंडागळे, सहसचिव शिवाजी पाटील, सदस्य नितीन सानप, चेतन ओमले, हरेश कडू, श्रेया मोरे, संपदा महाडिक, सचिन मोरे, अनिष गुरव,  आदींसह शाळेतील विद्यार्थी व कमिटी सदस्य उपस्थित होते...

1 जुलै ते 7 जुलै या साप्ताहात वनविभागाने संकल्प केल्याप्रमाणे सोसायटी सहभागी होऊन वृक्षारोपण करण्याचा संकल्प यशस्वी केला आहे. मागील उन्हाळ्याच्या झळा नागरिकांना जाणवल्या व तापमानात वाढ झाली होती. आता वृक्षारोपण कारण्याशिवाय पर्याय नाही. म्हणून सोसायटीने एकत्र येत ऑक्सिजन देणाऱ्या, सावली देणाऱ्या झाडांची लागवड करण्याचा निर्धार केला व वृक्षारोपण केले. त्यामुळे रोह्यात सर्वत्र अंकित फिओना सोसायटीचे कौतुक केले जात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post