सचिन चौरसिया प्रतिनीधी
रामटेक :- तालुक्यातील नंदापुरी येथे रामटेक विधानसभा क्षेत्राचे आमदार आशिषजी जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली “मुख्यमंत्री-माझी लाडकी बहिण” योजना नोंदणी करीता गावातील समस्त महिला-भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद प्राप्त झाला. या योजनेच्या माध्यमातुन महीलांना आर्थिक समृद्धीसाठी सन्मान निधी मिळेल. २१ ते ६५ वर्ष वयोगटातील प्रत्येक पात्र महिलांना मिळणार प्रत्येक महिन्याला रु.१५००/-. यातच एकुण २१९ पात्र महिलांची ऑफलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली...
यावेळी नंदापुरी येथील माजी सरपंच भुमेश्वर चाफले, माजी उपसरपंच मनोहर गुप्ता,सदस्य गुलाब चाफले, दादाराव हटवार, सदस्य रूखमांगत चाफले, अक्षय हटवार, भुषण चाफले, रमेश सव्वालाखे व असंख्य गावकरी महिला उपस्थित होत्या...
