सचिन चौरसिया प्रतिनिधी
रामटेक:- " झाडे लावा झाडे जगवा " ह्या गोष्टीला जागृत करण्यासाठी ग्रामस्थांनी दुष्काळावर मात करण्यासाठी वृक्षारोपण करणे गरजेचे आहे प्रत्येकाने एक तरी झाड लावावा असे प्रतिपादन नागपूर जिल्ह्याचे महिला सचिव कामिनी हटवार केंद्रीय मानव अधिकार सेवा संघटन नई दिल्ली यांनी केले...
झाडे लावा झाडे जगवा ही मोहीम चोखाळा गावात स्मशान दहन भूमी श्री शंकर जी देवस्थान येथे दि. १८ जुलै २०२४ ला राबविण्यात आली...
वृक्ष खूप महत्त्वाची भूमिका बजावतात हवा, पाणी, जमिनीचे स्वरक्षण, आपल्या पर्यावरणाचे संतुलन ठेवण्यासाठी आणि पर्यावरणाला प्रदूषणापासून वाचवण्यासाठी झाडे महत्त्वाची भूमिका बजावतात कारण वृक्ष आपल्यासाठी खूप मदत करतात वृक्ष आपल्याकडून कुठलीच गोष्टीची अपेक्षा न ठेवता त्यांच्यापासून मिळणाऱ्या सर्व गोष्टी मनुष्याला प्रदान करतात म्हणून वृक्ष हा मानवाच्या जीवनदायी मित्र आहे...
यावेळी लच्चिरामजी हटवार, शिवशंकर आष्टनकर, ताराचंद हटवार, चंदू हटवार, उमराव हटवार, जगनजी हटवार, जितू पिसे, विक्की पडोळे, राधेश्याम हटवार, विजय पिसे,तुषार हटवार, सुमित हटवार यांची प्रामुख्याने उपस्थिती होती...
