मयूर पालवणकर-: मुरुड रायगड
ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना भोसले तर उपसरपंचपदी भगवान शिद बिनविरोध...
रोहा तालुक्यातील श्रीमंत समजल्या जाणाऱ्या ऐनघर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी शिवसेना शिंदे गटाच्या अर्चना सचिन भोसले यांची बिनविरोध निवड करण्यात आली... निवड जाहीर होताच फटाक्यांच्या आतषबाजी व पेढे वाटून त्यांचे स्वागत करण्यात आले... यावेळी शिंदे गटाचे रोहा तालुका प्रमुख ऍड. मनोजकुमार शिंदे, विभाग प्रमुख प्रवीण ताडकर, उपविभाग प्रमुख मनोज खांडेकर, नागोठणे शहर प्रमुख अमित खांमकर यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते सचिन भोसले, रोहिदास लाड, निवास पवार, सुरेश वाघमारे, नामदेव वाघमारे, नारायण मोहिते, जगन कोकळे, महेश सिरसे, लक्ष्मण मोहिते, संजय कणघरे, आत्माराम खामकर, राम खामकर, निवृत्ती जंगले, जयेश जाधव, विजय भोसले, भारत सूटे, गणेश सुटे यांच्यासह विभागातील नागरिक उपस्थित होते...
फटाक्यांच्या आतषबाजीत झाले स्वागत
सरपंच कलावती कोकळे व उपसरपंच किशोर नावले यांनी दिलेल्या राजीनाम्यानंतर गुरूवार 13 जुन रोजी ग्रामसेवक तथा निवडणूक अधिकारी गोविंद शिद यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य मनोहर सुटे, विनोद निरगुडे, प्रकाश डोबले, भगवान शिद, सदस्या- अर्चना भोसले, सुषमा वाघमारे, प्रज्वली भोईर, सुवर्णा शिद, वैदही इंदुलकर, कल्याणी मोहिते, नकीबाई कोकळे यांच्या उपस्थितीत सरपंच व उपसरपंच निवडीसाठी घेण्यात आलेल्या विशेष सभेत सरपंच पदासाठी अर्चना सचिन भोसले तर उपसरपंच पदासाठी भगवान शिद यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2.30 वाजण्याच्या सुमारास निवडणूक अधिकारी गोविंद शिद यांनी सरपंच पदासाठी अर्चना सचिन भोसले तर उपसरपंच पदासाठी भगवान शिद यांची निवड झाल्याचे जाहीर केले... सरपंचपदी अर्चना भोसले तर उप सरपंचपदी भगवान भोसले यांची निवड जाहीर होताच फटाक्यांच्या आतषबाजी पेढे वाटून व पुष्पगुच्छ त्यांचे स्वागत करण्यात आले...
आश्वासन पूर्ण केल्याचे समाधान ऐनघर ग्रामपंचायत ही शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात ठेवण्याचे आश्वासन आमदार भरतशेठ गोगावले यांना दिल्यानंतर झालेल्या सरपंच उपसरपंच निवडणुकीत ग्रामपंचायत माझ्या सहकाऱ्यांच्या सहकार्याने आपल्या ताब्यात ठेवून आ. गोगावले यांना दिलेले आश्वासन आज पूर्ण केल्याचा मनस्वी आनंद व समाधान होत आहे...
