महाराष्ट्र वेदभुमी

ग्रामविकास परिवर्तन आघाडी, मापगावतर्फे १० वी १२ वी उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार


सोगाव - अब्दुल सोगावकर :

 अलिबाग तालुक्यातील मापगाव येथे मंगळवार दि.११ जून २०२४ रोजी मापगाव येथील धर्मशाळेत ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावतर्फे मापगाव पंचक्रोशीतील १० वी व १२ वी उत्तीर्ण झालेल्या ११२ गुणवंत विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला...




   या कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते विद्येची देवता असलेल्या सरस्वती देवीच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करत कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यानंतर सोगाव येथील प्रसिद्ध तैलचित्रकार चंद्रकला कदम मॅडम यांची कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून निवड करण्यात आली, यावेळी मापगाव पंचक्रोशीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमामधील १० वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये साईश सतीश पेडणेकर याने ९३% गुण मिळवले,तर रोशनी सूरज घरत हिने ९२.८०% गुण मिळविले आणि वैष्णवी महेंद्र हुमणे हिने ९२.४०% मिळविले तसेच सेजल प्रदीप मंडल हिने ९१.०७% गुण मिळविले याचबरोबर १२ वी मध्ये आर्या मंगेश सोनवणे हिने ९०% गुण मिळविले, तर साहिल तारानाथ सुर्वे याने ८६.३३% गुण मिळविले तसेच मृदुला संतोष घरत हिने ८१.६६% गुण मिळविले,अशा मापगाव पंचक्रोशीतील एकूण ११२ विद्यार्थी व विद्यार्थिनींचा या कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते विशेष गुण मिळविणाऱ्याना रोख पारितोषिक, प्रशस्तीपत्र,स्कुल बॅग व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.तर सर्व विद्यार्थांना स्कुल बॅग व प्रशस्तीपत्र व पुष्प देऊन गौरवकरण्यात आला... 

     






           यावेळी सर्व उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मोरे मॅडम, प्रसिद्ध तैलचित्रकार चंद्रकला कदम मॅडम,श्री क्लासेसचे चोन्ढीचे संतोष राऊत सर यांनी कौतुक करत मोलाचे मार्गदर्शन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या..

        या कार्यक्रमाला ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव चे मापगाव ग्रामपंचायत सदस्य विजय भगत, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच अशोकजी नाईक, मापगाव ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच वसीम कुर, अखिल भारतीय हक्क ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय सचिव बाबूशेठ थळे, ग्रामपंचायत सदस्या व भारतीय जनता पार्टी अलिबाग कार्यकारणी सदस्य तसेच महिला मोर्चा उपाध्यक्षा स्नेहा रुत, शिवसेना(शिंदे गट)मापगाव विभाग प्रमुख जगदीश सावंत, श्री क्लासेस चोंढीचे संतोष राऊत सर, माजी ग्रामपंचायत सदस्य मजीद कूर, मुद्स्सर कुर, गितेश करळकर, अजित घरत, प्रभाकर मोहिते, तेजस काठे, बाबू सोंडे, संतोष रुत, गितेश करळकर, सुनिल अनमाने, दत्ता गुरुजी, संजय राऊत सर, नागेश राऊत, प्रकाश गुळेकर, मोरे मॅडम, लायन सौ विद्या अधिकारी, प्रसिद्ध तैलचित्रकार चंद्रकला कदम मॅडम, जान्हवी बारे, जागृती सावंत, शिल्पा अनमाने, सिद्धी क्लासेसच्या घरत मॅडम, संगिता मल्हार, शफी वाकनिस, दत्तात्रेय राऊत, माजी ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ पाटील, भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका सरचिटणीस दिनेश राऊत, वजाहत कुर, राकेश करळकर, रुपेश निर्गुण, संतोष घरत, भारतीय जनता पार्टी अलिबाग तालुका युवा मोर्चा सदस्य अनुराग मोहिते असे अनेक मान्यवर तसेच उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी व विद्यार्थीनी आणि त्यांचे पालक आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते... 





याच कार्यक्रमात ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव यांच्यावतीने अखिल भारतीय हक्क ग्राहक संरक्षण परिषदेचे राष्ट्रीय सचिव बाबूशेठ थळे यांचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी बाबूशेठ थळे यांना उपस्थितांनी भरभरून शुभेच्छा दिल्या...



तसेच मापगाव येथील आदित्य प्रभाकर मोहिते, महेश मनोहर कैलकर, ओमकार संतोष कैलकर यांनी प्रथमच मापगाव, अलिबाग येथून नेपाळ देशात दुचाकीवरून प्रवास करत जाऊन काठमांडू, पोखरा, पशुपतीनाथ येथील तीर्थक्षेत्राचे १५ दिवसात दर्शन घेऊन सुखरूप व यशस्वीरित्या आपल्या मूळगावी परत आल्याबद्दल त्यांचा ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगावतर्फे उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भव्य सत्कार करण्यात आला...




       या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत अजित हरवडे सर यांनी उपस्थित सर्वांची मने जिंकली...

फोटो लाईन :

पहिल्या चित्रात- ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह सत्कार करताना मान्यवर,

दुसऱ्या चित्रात - ग्रामविकास परिवर्तन आघाडी मापगाव तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात उपस्थित विद्यार्थी व मान्यवर,

Post a Comment

Previous Post Next Post