कोलाड (श्याम लोखंडे)
जीव गेल्यावर उपाययोजना केल्या जातील का?
रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्र हद्दीत रस्त्यावरून करावा लागतो कर्मचारी वर्गाला चिखलमय मातीतून प्रवास दुर्दैवाने रस्ता चांगला असूनही माती चिखलाचे साम्राज्य याला जबाबदार कोण तर गटार खोदाई केलेली माती चक्क रस्ताभर पसरल्याने पाऊस पडल्याने ती चिखलम झाली असून या रस्त्यावरून असंखे कामगार ये जा करत असतात त्यांचा प्रवास अक्षरशः धोक्याचे झाले असून यावर कोणाचे तरी जीव गेल्यावर संबधीत खात्याकडून उपाय योजना केल्या जातील का असा संताप व्यक्त केला जात आहे...
रोहा धाटाव एम आय डी सी हद्दीतील सांडपाणी तसेच पावसाळी पाणी वाहणाऱ्या गटार लाईंचे काम संबधीत ठेकेदार यांच्या कडून राजरोस पणे तसेच मनमानी प्रमाणे सुरू असल्याचे सुरू आसलेल्या कामावरून दिसून येत आहे मात्र त्यावर नक्की कोणाचे नियंत्रण आहे हाच प्रश्न उपस्थित केला जात आहे.तर जेसीबी मशनरीने खोदकाम केलेली चिखलमय माती संपुर्ण रस्ताभर पसरली आहे त्यावर कोणतीच उपाय योजना करण्यात आली नाही तर जागो जागी मातीचे ढिगारे साचवून ठेवण्यात आले असून त्यात मंगळवारी रात्री जोरदार पाऊस पडल्याने ती माती चिखलमय चिकट झाली असून कामावर जा ये करणारे कामगार यांच्या दुचाकी वाहने धोकादायक ठरत आहे तर काही दुचाकी चालक घसरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच संबधीत खात्याला हे काम करण्याचे सुचत आहे का असा खडा सवाल उपस्थित केला जात आहे...
हद्दीतील जैनवाडी स्टॉप ते निलिकाँन कंपनी कडे जाणारा हा रस्ता आहे त्यामुळे आर डी सी,रोहा डाय,बेक कंपनी, प्रिव्ही, सम्पट्रम, एफ डी सी, अन्सूल युनिट टू, मझदा, निलिकाँन इत्यादी कारखाने याचा हा मार्ग तर बहुसंख्येने काम करणारे कामगार या मार्गावरून कारखान्यात जा ये करतात तर काही कामगार त्यांच्या बदलत्या पाली नुसार कामावर जातात मात्र त्यांना या चिखलमय मातीतून तारेवरची कसरत करून प्रवास करावे लागते हे या जागतिक स्तरावर नावलौकिक असलेल्या औद्योगिक क्षेत्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल हे म्हंटले तर वावग ठरणार नाही...
कारखान्यात पोहचण्याआधित कामगार सुरक्षा धोक्यात याला जबाबदार कोण भर रस्त्यात मार्गावरच चिखल माती प्रवास झाला धोक्याचा यावर कोण उपाय योजना करणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले असून काम करणारे संबधीत ठेकेदार यांच्यावर नियंत्रण कोणाचे दिलेल्या मुदतीत काम पूर्ण होतो की नाही तसेच सुरू असलेल्या कामाचे निकश काय सुरू असलेले नाल्यांचे आर सी सी गटार लाईनचे काम याची पाहणी केली जाते की नाही तर सुरू असलेल्या कामाबाबत दिरंगाई का ? असा प्रश्न निर्माण झाला आहे तर रस्त्यावर चिखल माती पसरल्याने ती अधिक या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या कामगार वर्गाला धोकादायक ठरत आहे त्यामुळे याकडे संबधीत खात्याच्या अधिकारी वर्गाने कानाडोळा न करता तातडीने लक्ष द्या अशी मागणी समस्त कर्मचारी वर्गातून केली जात आहे...

