सोगांव - अब्दुल सोगावकर :
अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी दी लाईफ फाऊंडेशन तर्फे शुक्रवार दि. २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय जागतिक योग दिनाचे औचित्य साधून रा. जि. प. शाळा मांडवे, रा. जि.प. शाळा वायशेत, शासकीय आश्रम शाळा कोळघर येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस साजरा केला...
योग साधनेचा कार्यक्रम घेण्यासाठी योग प्रशिक्षक शिवांजली पाटील (कैवल्यधाम लोणावळा सेंटर) यांना दी लाईफ फाउंडेशन तर्फे विशेष आमंत्रित करण्यात आले होते...
विद्यार्थ्यांना योग साधनेचे महत्त्व पटवून देताना त्यांना सध्याच्या धावपळीच्या जीवनामध्ये व्यक्तीने निरोगी व तणावमुक्त जीवन कसे जगावे तसेच योगासनांच्या माध्यमातून शारीरिक, मानसिक व भावनिक संतुलन कसे जपावे, शाळेचा अभ्यास करण्यासाठी एकाग्रता व स्मरणशक्ती वाढवण्यासाठी योग साधना महत्त्वपूर्ण कशी ठरते, असे अनेक उद्देश साध्य करण्यासाठी दी लाईफ फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीने अलिबाग तालुक्यातील विविध भागात जागतिक योग दिवस कार्यक्रम साजरा करण्यात आला...
योग प्रात्यक्षिक कार्यक्रमामध्ये ताडासन, वृक्षासन, अर्धचक्रासन, अर्ध त्रिकोणासन, क्रियाकटीचलन, उतकटासन, पादहस्थासन, उत्तीतउर्ध्व धनुरासन, वज्रासन, शशांकासन, मंडूकासन, योगमुद्रा, ब्रह्ममुद्रा, पर्वतासन, कपालभाती, नाडीशोधन, अनुलोम - विलोम, प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम व ओमकार प्रार्थना यांसारखी विविध आसने घेण्यात आली. यावेळी शाळा परिसरातील ग्रामस्थ, रा. जि. प. शाळेतील व आश्रम शाळेतील विद्यार्थी व शिक्षक यांनी मोठ्या संख्येने हजर राहून चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला. ही योग शिबिरे आयोजित करण्यासाठी दी लाईफ फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली...
फोटो लाईन : जागतिक योग दिनानिमित्त शाळेतील सर्व मुलांना योग प्रशिक्षण देताना मान्यवर,